छत्रपती संभाजीनगर : शेकोटीतून ठिणगी उडून कपड्यावर पडली अन् पेट घेतला, वृद्धाच्या दुर्दैवी मृत्यूने हळहळ

मुंबई तक

29 Nov 2025 (अपडेटेड: 29 Nov 2025, 09:46 AM)

Chhatrapati Sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगर : शेकोटीतून ठिणगी उडून कपड्यावर पडली अन् पेट घेतला, वृद्धाच्या दुर्दैवी मृत्यूने हळहळ

 Chhatrapati Sambhajinagar News

Chhatrapati Sambhajinagar News

Google CTA

बातम्या हायलाइट

point

छत्रपती संभाजीनगर : शेकोटीतून ठिणगी उडून कपड्यावर पडली

point

वृद्धाच्या दुर्दैवी मृत्यूने हळहळ

वैजापूर : थंडीपासून संरक्षण मिळवण्यासाठी पेटवलेल्या शेकोटीनेच एका वृद्धाचा जीव घेतला. वैजापूर तालुक्यातील सटाणा येथील वस्तीवर बुधवारी उशिरा रात्री ही दुर्दैवी घटना घडली. रघुनाथ गायके (वय 60) असे मृत व्यक्तीचे नाव असून, शेकोटीतील ठिणगी त्यांच्या कपड्यांवर पडल्याने ते गंभीर जखमी झाले आणि अखेरीस यात त्यांचा मृत्यू झाला.

हे वाचलं का?

मिळालेल्या माहितीनुसार, रघुनाथ गायके हे रोजच्या प्रमाणे रात्री शेतावरील खोपीत झोपण्यासाठी गेले होते. त्या ठिकाणी थंडीचा चटका जाणवत असल्याने त्यांनी साडेआठ ते नऊच्या दरम्यान शेकोटी पेटवली. तेव्हा ते एकटेच असल्याने शेकोटीजवळ बसून ऊब घेत होते. मात्र, त्यांच्या लक्षात न येता शेकोटीतून उडालेली ठिणगी थेट त्यांच्या कपड्यांवर पडली. काही क्षणांतच कपड्यांनी पेट घेतला आणि आग झपाट्याने पसरू लागली.

हेही वाचा : ऐन निवडणुकीच्या तोंडावर मनसेच्या मोठ्याने नेत्याने राज ठाकरेंची सोडली साथ, 'या' पक्षात करणार एंट्री?

गायके यांच्या विव्हळण्याचा आवाज ऐकताच वस्तीवर थोड्या अंतरावर राहणारे शेतकरी तात्काळ त्या दिशेने धावले. त्यांनी आग आटोक्यात आणण्याचा भरपूर प्रयत्न केला. तत्क्षणीच नातेवाईकांनी त्यांना वैजापूरच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. परंतु, गंभीर भाजल्यामुळे डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. त्यांच्या पश्चात पत्नी आणि एक मुलगा असून कुटुंबावर दु:खाचा पर्वत कोसळला आहे.

दरम्यान, छत्रपती संभाजीनगरमध्येही हवामानात बदल जाणवत असून शहरात पुन्हा गारठा वाढला आहे. शुक्रवारी दिवसाचे कमाल तापमान 29.2 अंश, तर किमान तापमान 16.6 अंश नोंदवले गेले. किमान तापमान मागील दिवसांच्या तुलनेत जरी जास्त असले तरी वातावरणात गारवा स्पष्ट जाणवत आहे. नोव्हेंबरच्या उत्तरार्धात तापमानात वाढ झाल्याने थंडी कमी झाली होती; मात्र आता पुन्हा थंडीची चाहूल लागल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

अंतवस्त्रात 6 किलो सोनं ठेवलं, मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकात पोहोचले, गुप्तचर यंत्रणेला कुणकुण लागली अन्...