Nashik : कार-कंटेनरची भीषण धडक ! धुळ्याच्या नगरसेवकांसह चौघे जागेवरच ठार

मुंबई तक

18 Sep 2023 (अपडेटेड: 18 Sep 2023, 09:57 AM)

Nashik Accident : मुंबईहून धुळ्याकडे निघालेल्या कारने कंटेनरने जोरदार धडक दिल्याने धुळ्याच्या नगरसेवकासह त्यांच्या मित्रांचा जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की, कारमध्ये चौघांचे मृतदेह अडकून पडले होते.

four people including corporator of dhule died in car container accident in nashik on mumbai agra highway.

four people including corporator of dhule died in car container accident in nashik on mumbai agra highway.

follow google news

Nashik Accident : मुंबई-आग्रा महामार्गावर कार-कंटेनरचा भीषण अपघात (Car-container accident) होऊन धुळ्यातील नगरसेवकासह चौघांचा जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की, कारने कंटेरनला धडक देताच कारचा चक्काचूर झाला होता. मुंबई-आग्रा महामार्गावर (Mumbai-Agra Highway) कंटेनरला कारने जोरदारपणे धडक दिल्याने मृतदेह कारमध्येच अडकून पडले होते. या घटनेची माहिती पोलिसांनी कळताच क्रेनद्वारे कार बाजूला करुन कारमधील मृतदेह बाहेर काढण्यात आले. या अपघातानंतर महामार्गावरील वाहतून काही काळ रखडली होती. धुळ्याचे नगरसेवक (Dhule Corporator) अपघातात मृत झाल्याचे समजताच अनेक लोकांनी घटनास्थळी धाव घेतली होती.

हे वाचलं का?

कारमध्ये अडकले मृतदेह

नाशिक जिल्ह्यातील चांदवडजवळ नमोकार तीर्थक्षेत्रा समोरील मुंबई-आग्रा महामार्गावर कार आणि कंटेनरचा भीषण अपघात झाला. या अपघाताध्ये चौघेजणही जागीच ठार झाले. कारची धडक इतकी भयानक होती की, कारचालकासह तिघांचेही मृतदेह कारमध्ये अडकून पडले होते.

हे ही वाचा >> Pune Murder : दारू पिऊन दोस्तीत केली कुस्ती, अन् नंतर सगळं भयानकच घडलं

नगरसेवकांसह मित्रांचा अंत

या अपघातात धुळ्यातील प्रभाग क्र. 7 चे भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक असलेले किरण अहिरराव आणि त्यांच्या मित्रांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना धुळ्यात समजताच अनेकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली.

ओळख पटली नाही

कारच्या अपघातानंतर पोलिसांनी क्रेनद्वारे अडकलेली कार बाजूला करुन आतमध्ये अडकलेले मृतदेह बाहेर काढण्यात आले. त्यानंतर कार क्रमांकावरून अपघातात ठार झालेल्या लोकांची ओळख पटवण्याचे काम सुरु होते. हे सर्वजण नाशिककडून धुळ्याकडे चालले होते. अपघातानंतर सोमा टोलवेज कंपनीचे अपघातग्रस्त पथक घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी मदतकार्याला सुरुवात केली.

    follow whatsapp