खून अलिबागमध्ये अन् बॉडी आंबेनळी घाटात, आजीला संपवणाऱ्या नातवाने काय सांगितलं?

इम्तियाज मुजावर

• 08:56 AM • 05 Jun 2026

सातारा जिल्ह्यातील आंबेनळी घाट पुन्हा एकदा एका थरारक आणि गंभीर गुन्हेगारी घटनेमुळे चर्चेत आला आहे. घाटातील खोल दरीत एका वृद्ध महिलेचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे.

Satara Crime

Satara Crime

Google CTA

बातम्या हायलाइट

point

खून अलिबागमध्ये अन् बॉडी आंबेनळी घाटात

point

आजीला संपवणाऱ्या नातवाने काय सांगितलं?

Satara Crime : सातारा जिल्ह्यातील आंबेनळी घाट पुन्हा एकदा एका थरारक आणि गंभीर गुन्हेगारी घटनेमुळे चर्चेत आला आहे. पोलादपूर तालुक्याच्या हद्दीतील बावली टोक ते दाभिल टोक दरम्यान असलेल्या खोल दरीमध्ये एका वृद्ध महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. यामुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. अलिबाग येथील एका नातवाने स्वतःच्या सख्ख्या आजीचा निर्घृण खून केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्याने आजीचा मृतदेह या दुर्गम घाटातील खोल दरीत फेकून दिला.

हे वाचलं का?

पुरावा नष्ट करावा म्हणून..

मिळालेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी युवकाने दोन दिवसांपूर्वीच आपल्या आजीची हत्या केली होती. या गुन्ह्याची वाच्यता होऊ नये म्हणून त्याने मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी आंबेनळी घाटाची निवड केली आणि मृतदेह दरीत फेकून दिला. अलिबाग पोलिसांनी या प्रकरणाचा वेगाने तपास करत संशयित युवकाला ताब्यात घेतले असता, कसून केलेल्या चौकशीत त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. इतकेच नव्हे तर, मृतदेह नक्की कोणत्या ठिकाणी फेकला होता, ते ठिकाणही त्याने पोलिसांना दाखवले.

हे ही वाचा : Monsoon Update: 10 जिल्ह्यांमध्ये तुफान पाऊस बरसणार.. मान्सूनची दमदार हजेरी, थोड्याच वेळात कोसळधार!

..आणि रेस्क्यू टीम दरीत उतरली

आरोपीने दिलेल्या माहितीच्या आधारे अलिबाग पोलिसांचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. मात्र, आंबेनळी घाटातील अत्यंत धोकादायक वळणे आणि अतिशय खोल दरीमुळे मृतदेह बाहेर काढणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. अशा कठीण परिस्थितीत 'प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टीम' तसेच 'महाबळेश्वर ट्रेकर्स'च्या जवानांना पाचारण करण्यात आले. या जवानांनी रेस्क्यू मोहीम राबवत आणि योग्य ती खबरदारी घेत खोल दरीत उतरून वृद्धेचा मृतदेह यशस्वीरीत्या बाहेर काढला.

हे ही वाचा : Personal Finance: 'ही' कागदपत्रं नसतील तर चुकूनही घेऊ नका ती जमीन, नाहीतर…

आंबेनळी घाटातील सुरक्षेचं काय?

या धक्कादायक आणि अंगावर काटा आणणाऱ्या घटनेमुळे संपूर्ण महाबळेश्वर आणि पोलादपूर परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे. काही दिवसांपूर्वीच याच आंबेनळी घाटात झालेल्या भीषण अपघातात आठ युवकांना आपला जीव गमवावा लागला होता, या घटनेची जखम ताजी असतानाच आता हे क्रूर हत्याकांड समोर आले आहे. विशेष म्हणजे, यापूर्वीही याच परिसरात एका महिलेचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला होता. एकामागून एक घडणाऱ्या या गूढ आणि गंभीर घटनांमुळे आंबेनळी घाट पुन्हा एकदा सुरक्षेच्या दृष्टीने चिंतेचा विषय बनला असून, या प्रकरणाचा पुढील तपास अलिबाग पोलीस करत आहेत.