Maharashtra Weather : राज्यावर दुहेरी संकट, 'या' जिल्ह्यांची लाही लाही होणार, IMD अलर्ट

मुंबई तक

20 May 2026 (अपडेटेड: 20 May 2026, 04:19 PM)

Maharashtra Weather : राज्यात पुन्हा एकदाच हवामानाचा मोठा बदल जाणवणार आहे. काही ठिकाणी अवकाळी पावसाची अधिक शक्यता आहे. तसेच काही भागांमध्ये उष्णतेची लाट अद्यापही कायम राहणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. अशातच जाणून घेऊयात 20 मे 2026 रोजी राज्यातील एकूण हवामानाचा अंदाज. 

Maharashtra Weather

Maharashtra Weather

Google CTA

बातम्या हायलाइट

point

राज्यात पुन्हा एकदाच हवामानाचा मोठा बदल

point

काही ठिकाणी अवकाळी पावसाची

point

20 मे 2026 रोजी राज्यातील एकूण हवामानाचा अंदाज

Maharashtra Weather : राज्यात पुन्हा एकदाच हवामानाचा मोठा बदल जाणवणार आहे. काही ठिकाणी अवकाळी पावसाची अधिक शक्यता आहे. तसेच काही भागांमध्ये उष्णतेची लाट अद्यापही कायम राहणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. तसेच सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर या दोन जिल्ह्यांना हवामान विभागाने पावसाचा अलर्ट वर्तवला आहे. जाणून घेऊयात 20 मे 2026 रोजी राज्यातील एकूण हवामानाचा अंदाज. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : "हाडांपर्यंत जखम, डाव्या कानातून रक्त..'', लग्नात 1 कोटी खर्चून सुनेला हुंड्याची मागणी

कोकण

कोकण विभागात हवामानात मोठा बदल निर्माण होणार असल्याची शक्यता आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे. तर रायगड आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांना अधिकृतपणे कोणताही अलर्ट जारी केला नाही, मात्र ढगाळ वातावरण राहू शकते. 

पश्चिम महाराष्ट्र 

पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्याला पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला. तसेच काही भागांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवली आहे. पुणे, सांगली, सातारा आणि सोलापूर या चार जिल्ह्यांत दुपारनंतर वातावरणात बदल जाणवण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी ढगाळ वातावरणाची शक्यता आहे. 

मराठवाडा 

मराठवाडा विभागात हवामान हे उष्ण अधिक राहील. हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांना उष्णतेचा यलो अलर्ट जारी करण्यात आला. तसेच लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांना कोणताही अलर्ट दिला नाही, मात्र तापमानात वाढ होण्याची अधिक शक्यता आहे. 

हे ही वाचा : तरूण लिव्ह-इन पार्टनरचा मृतदेह घेऊन आला, रात्री स्मशानभूमीत..

विदर्भ 

विदर्भात परिस्थिती गंभीर असून अमरावती, अकोला आणि वर्धा या जिल्ह्यांना उष्णतेचा ऑरेंज अलर्ट दिला. याच जिल्ह्यांना उष्माघाताचा मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.