Maharashtra Weather : राज्यात उन्हाळा ऋतु सुरु असून दुहेरी वातावरणाचं संकट निर्माण होण्याची शक्यता आहे. 26 मार्च 2026 रोजी राज्यातील कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात अवकाळी पावसाने थैमान घातल्याचे सांगण्यात येत आहे. याचा पिकांवर मोठा परिणाम झालेला दिसून येत आहे. शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झाल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. अशातच 27 मार्च 2026 रोजी राज्यातील एकूण हवामान विभागाने महत्त्वाचा अलर्ट जारी केला आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : धार्मिक भावना! दर गुरुवारी मांस विक्री बंद, 5 हजारांच्या दंडाची तरतूद; महाराष्ट्रातील कोणत्या नगरपरिषदेने घेतला निर्णय?
कोकण
कोकणात ठाणे, मुंबई, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्गात हवामान विभागात वातावरण कोरडं राहण्याची शक्यता आहे. तसेच या विभागात उष्ण आणि दमट हवामानाची स्थिती जाणवेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
मध्य महाराष्ट्र
मध्य महाराष्ट्रात धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, पुणे, अहिल्यानगर, कोल्हापूर, सांगली आणि सोलापूरमध्ये हवामान विभागाने कोरड्या हवामानाचा अंदाज जारी केला.
मराठवाडा
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, नांदेड, परभणी आणि धाराशिवमध्ये कोरड्या हवामानाचा अंदाज जारी करण्यात आला. तसेच अकोला, अमरावती आणि बुलढाणा येथे हवामान विभागाने कसलाही अंदाज जारी केला नाही. तसेच भंडाऱ्यात हलका पाऊस असणार आहे.
हे ही वाचा : धडकी भरवणारा 'एनर्जी लॉकडाउन' भारतात होणार लागू? काय खरं काय खोटं.. नेमकं घ्या समजून!
विदर्भ
विदर्भातील चंद्रपूर, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यात अवकाळी पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. तसेच गडचिरोलीत हलक्या पावसाची शक्यता आहे.
ADVERTISEMENT











