Parliament Special Session : हे अधिवेशन ऐतिहासिक निर्णयांचे, नरेंद्र मोदींनी दिला नारा

मुंबई तक

18 Sep 2023 (अपडेटेड: 18 Sep 2023, 06:02 AM)

Parliament Special Session : देशात आजपासून विशेष अधिवेशनाला सुरुवात होत आहे. त्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपला भारत 2047 पर्यंत विकसित देश म्हणून नावारुपाला येईल. त्यासाठी सर्वांनीच नवी प्रेरणा, नवे संकल्प घेऊन यशस्वी भारतासाठी प्रयत्नशील राहू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

pm narendra modi special session new parliament

pm narendra modi special session new parliament

follow google news

Parliament Special Session : संसदेचे आजपासून विशेष अधिवेशन सुरु होत आहे. त्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी पत्रकारांशी संवाद साधत आपल्या पक्षातील सहकाऱ्यांसह विरोधकांनाही त्यांनी देशाच्या विकासासाठी प्रयत्नशील राहू असं मत व्यक्त केले. यावेळी त्यांनी सांगितले की, विशेष अधिवेशनाचा (Special Session) कालावधी छोटा असला तरीही देशासाठी ही एक मोठी घटना असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे नवा संकल्प, नवी ऊर्जा, नवी प्रेरणा घेऊन हे विशेष अधिवेश पार पाडू असा नारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला. (parliament special session new parliament india developed country 2047 pm narendra modi)

हे वाचलं का?

ऐतिहासिक निर्णय

चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान उतरवणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला असून शिवशक्ती पॉईंटवर तिरंगा अभिमानाने फडकतो आहे असं म्हणत त्यांनी जी 20 परिषद यशस्वीपणे पार पडली. ही खरी तर देशासाठी गर्वाची गोष्ट असल्याचेही त्यांनी अभिमानाने सांगितले. यावेळी त्यांनी हेही सांगितले की, खरं तर हे अधिवेशन हे ऐतिहासिक निर्णयांचे असणार आहे. त्यामुळे देशाला एक वेगळी उंची प्राप्त होणार आहे.

हे ही वाचा >> संसदेचे आजपासून विशेष अधिवेशन, मोदी सरकारच्या निर्णयाकडे देशाचे लक्ष

काळ छोटा पण महत्वाचा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, आजपासून पाच दिवस संसदेचं विशेष अधिवेशन सुरु होत आहे. हे अधिवेश पाच दिवस असले तरी आणि काळ छोटा असला तरी या काळात देशासाठी महत्वाचे निर्णय घेण्यासाठी ही मोठी घटना असल्याचे मत त्यांनी नोंदविले आहे.

उत्साही वातावरणात विशेष अधिवेशन

जुन्या काळातील वाईट गोष्टी सोडून नव्या गोष्टी घेऊन नव्या संसदेत प्रवेश करुया म्हणत त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना सहकार्य करण्याचेही आवाहन केले आहे. यावेळी ते म्हणाले की, यानिमित्ताने आपण चांगल्या गोष्टी करुया. विरोध करण्यासाठी वर्षातील अनेक दिवस आहेत. मात्र या विशेष अधिवेशनाच्या निमित्ताने आपण या छोट्या काळात महत्वाचे निर्णय घेऊ शकतो असंही त्यांनी यावेळी सांगितले.

निर्विघ्न रुपाने भारताचे संकल्प पूर्ण

आजपासून संसदेचे विशेष अधिवेशन सुरु होत असले तरी उद्यापासून गणरायचे स्वागत होते आहे. त्यामुळे या अधिवेशनाच्यानिमित्ताने निर्विघ्न रुपाने भारताचे स्वप्न पूर्ण करु असा विश्वासही नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. आपल्या सरकारच्या काळात नव्या संसदेत आगमन होत आहे. त्यामुळे जुन्या वाईट गोष्टी सोडून नव्या गोष्टी घेऊन नव्या संसदेत प्रवेश करु व देशाला विकसित करु असा विश्वास व्यक्त केला आहे.

हे ही वाचा >> Special Parliament session : मोदी सरकारचं पोस्ट ऑफिस विधेयक काय?

2047 पर्यंत भारत विकसित देश

पंतप्रधान नरेंद्र मोदी विशेष अधिवेशनाच्या निमित्ताने पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले की, चांद्रयान मोहीम यशस्वीपणे पार पाडून चंद्रावरही आपला तिरंगा अभिमानाने फडकत आहे. तर जी 20 परिषद यशस्वीपणे पार पडल्याने ती एक भारतासाठी गर्वाची गोष्ट ठरली आहे. त्यामुळे आता विशेष अधिवेशनातही नवा संकल्प, नवी ऊर्जा, नवी प्रेरणा भारतासाठी काम करु. नव्या विधेयकांबरोबरच नवे निर्णय घेऊन भारत हा 2017 पर्यंत विकसित देश म्हणूनही नावारुपाला येईल असंही त्यांनी यावेळी सांगितले.

    follow whatsapp