लग्नानंतरही जोडप्यांच्या आयुष्यात छोट्या-छोट्या समस्या येत राहतात. काही जोडप्यांचं ट्यूनिंग एकमेकांशी जुळत नाही.. तर काही जोडपी एकमेकांशी अजिबातच जुळवून घेऊ शकत नाही. आजच्या काळात विवाहबाह्य संबंधांचीही अनेक प्रकरणे पाहायला मिळत आहेत. ब्रिटनमध्ये राहणाऱ्या प्रसिद्ध लेखिका कोलीन नोलन (Coleen Nolan) ज्या लोकांना त्यांच्या वैयक्तिक जीवन, लैंगिक जीवन आणि नातेसंबंधांबद्दल सल्ला देतात, त्यांच्याकडे एका महिलेने सल्ला मागितला आहे. या महिलेने कोलीनला एक प्रश्न विचारत तिच्याकडे सल्ला मागितला की तिने काय केलं पाहिजे? महिलेच्या प्रश्नावर कोलीनने खूप छान उत्तर दिले आहे. (such a secret came to know about friends husband extramarital affair relationship advice)
ADVERTISEMENT
महिलेने कोलीनला विचारला ‘हा’ प्रश्न
कोलीन नोलनकडे एका मुलीने मदत मागताना विचारले होते “माझ्या एका मैत्रिणीच्या नवऱ्याचे सध्या अफेअर आहे. पण मी माझ्या मैत्रिणीला ती गोष्ट अद्यापही सांगितलेली नाही. कारण माझी मैत्रीण दु:खी होईल आणि ते मला पाहवणार नाही. मला माहित नाही माझी मैत्रीण तिच्या पतीमध्ये असं काय पाहते. कदाचित तिच्यासाठी हे फक्त शारीरिक आकर्षण असू शकेल. मला माहित आहे की तिचा नवरा स्वार्थी आहे. त्याचे गेल्या काही काळापासून एका महिलेशी अनैतिक संबंध आहेत आणि माझ्या मैत्रिणीला याबद्दल काहीही माहिती नाही. पण मी तिला अद्याप काहीही सांगितलेले नाही.. कारण मला तिला दुखवायचं नाही. मी असा विचार करत होतं की, सारं काही ठीक होईल.. तिचा पती सुधारेल.”
हे ही वाचा>> सेक्स आणि हस्तमैथुनावर पोप फ्रान्सिस यांचं मोठं विधान; सर्वत्र चर्चा
पुढे असं म्हटलं की, “माझ्याकडे कोणताही ठोस पुरावा नाही. मी तिच्या पतीला त्या महिलेसोबत कधीच पाहिले नाही. पण मला माहित आहे की त्याचे प्रेमसंबंध आहे. मला तिच्या नवऱ्याचा खूप राग येतो. मी काय करू? मी याबात माझ्या मैत्रिणीला सांगायला हवं का?”
कोलीन यांनी दिले जबरदस्त उत्तर
कोलीनने या प्रश्नाच्या उत्तरात सांगितले, “ही एक अतिशय गंभीर परिस्थिती आहे कारण यामुळे एकतर तुमची मैत्री तुटू शकते किंवा तुमच्या मैत्रिणीचे आयुष्य खराब होऊ शकते. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे, तुमच्याकडे याचा कोणताही पुरावा नाही. “मला वाटते की तुम्ही तुमच्या मैत्रिणीच्या नवऱ्यासोबत बोलण्याचा प्रयत्न केला पाहिजे.”
हे ही वाचा>> Oyo हॉटेलमध्ये नातेवाईकासोबत अनैतिक संबध, काय घडलं हॉटेलमध्ये?
“मैत्रिणीच्या नवर्याला सांग की तुम्हाला त्याच्या अफेअरबद्दल माहिती आहे. त्यामुळे तुम्ही तिच्या नवऱ्याला समजावून सांगा की, जर त्याने स्वतः त्याच्या पत्नीला ही बाब सांगितलं तर ते चांगले होईल आणि कदाचित ती त्याला माफही करेल. पण जर त्याच्या बायकोला ही गोष्ट बाहेरून समजली तर परिस्थिती बिघडू शकते. ही गोष्ट सांगितल्यानंतर मैत्रिणीच्या पतीला विचार करू द्या, त्यामुळे तो स्वतः जाऊन बायकोला सत्य सांगेल..”
कोलीन पुढे म्हणाली, “जर तुमच्या मैत्रिणीने तुम्हाला नंतर विचारले की तुम्हाला तिच्या अफेअरबद्दल माहिती होतं का? तर तुम्ही म्हणू शकता की मी तशा काही अफवा ऐकल्या होत्या. त्यानंतर मी तुझ्या पतीशी बोलले होते आणि त्याला हे सर्व संपवण्याचा सल्ला दिला होता.”
ADVERTISEMENT











