CISF च्या डायरेक्टर जनरलचा पगार किती? 8 व्या वेतन आयोगानंतर किती होणार वाढ? आकडा वाचून थक्कच व्हाल

देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या CISF च्या डायरेक्टर जनरलला किती पगार मिळतो? असा प्रश्न अनेकांच्या मनात येत असेल. 8 व्या वेतन आयोगानंतर त्यांच्या पगारात नेमकी किती वाढ होईल? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

CISF मधील  DG चा पगार किती? 8 व्या वेतन आयोगानंतर पगारात किती वाढ?

CISF मधील DG चा पगार किती? 8 व्या वेतन आयोगानंतर पगारात किती वाढ?

मुंबई तक

• 10:00 AM • 14 May 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

CISF मधील DG चा पगार किती?

point

8 व्या वेतन आयोगानंतर DG च्या पगारात किती वाढ?

point

सध्या, CISF मधील DG ला किती पगार मिळतो?

CISF DG Salary: केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल म्हणजेच CISF हे देशाच्या सुरक्षा व्यवस्थेचा एक महत्त्वाचा भाग आहे. विमानतळ, मेट्रो, सरकारी इमारती आणि अनेक ठिकाणांची सुरक्षा CISF जवानांच्या हातात असते. या सुरक्षा दलाचं नेतृत्व  डायरेक्टर जनरल (DG) करतात. देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या DG ला किती पगार मिळतो? असा प्रश्न अनेकांच्या मनात येत असेल. 8 व्या वेतन आयोगानंतर त्यांच्या पगारात नेमकी किती वाढ होईल? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. 

हे वाचलं का?

सध्याच्या काळात, हे पद वरिष्ठ अधिकारी राजविंदर सिंह भट्टी यांच्या हातात आहे. त्यांनी 28 ऑगस्ट 2024 रोजी CISF चे महासंचालक म्हणजेच (DG) म्हणून पदभार स्वीकारला आणि 30 सप्टेंबर 2025 पर्यंत ते या पदावर राहतील. यानंतर ते सेवानिवृत्त होतील. राजविंदर सिंग भट्टी हे 1990 च्या बॅचचे भारतीय पोलिस सेवा (IPS) अधिकारी आहेत. तसेच, ते बिहार कॅडरमध्ये येतात. तीन दशकांहून अधिक काळाच्या सेवेतील अनुभवात त्यांनी बऱ्याच महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे.

हे ही वाचा: Operation Sindoor : 18 विमानतळ बंद..430 फ्लाईट रद्द, पाकिस्तान भारतावर करणार पलटवार?

CISF DG चा सध्याचा पगार

सध्या, CISF च्या 'डायरेक्टर जनरल'ला  7 व्या वेतन आयोगाअंतर्गत वेतन मिळते. DG चे पद हे अखिल भारतीय सेवा आयपीएस(IPS) अधिकाऱ्याच्या समतुल्य आहे, जे वेतन पातळी 17 किंवा सचिव पातळी (स्तर 17- सर्वोच्च स्केल) मध्ये आहे. या स्केलमध्ये, त्यांना दरमहा सुमारे 2,25,000 रुपये निश्चित वेतन मिळते. सर्वोच्च वेतन असल्याने यामध्ये ग्रेड पे नाही. याव्यतिरिक्त, त्यांना सरकारी निवासस्थान, वाहन, चालक, कर्मचारी आणि इतर सुविधा देखील मिळतात.

हे ही वाचा:  NHDC मध्ये 'या' पदांसाठी बंपर भरती; तगडा पगार मिळेल, अर्ज करण्याची शेवटची तारीख काय?

8 व्या वेतन आयोगाअंतर्गत किती पगार मिळेल?

जर सरकारने आठवे वेतन आयोग लागू केले तर सध्याची महागाई आणि खर्च लक्षात घेऊन सर्व केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात 20 टक्के ते 30 टक्के वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जर हीच टक्केवारी CISF विभागाच्या  DG च्या पगारावर लागू केली तर त्यांचा पगार दरमहा 2025 लाख रुपयांवरून 2.70 लाख ते 2.90 लाख रुपयांपर्यंत पोहोचू शकतो.

    follow whatsapp