रामपूर: उत्तर प्रदेशातील रामपूर जिल्ह्यातून नातेसंबंधांना लाज आणणारी एक घटना समोर आली आहे. येथे, होणऱ्या सुनेला तिच्या सासऱ्यानेच पळून नेल्याची धक्कादायक गोष्ट समोर आली आहे. हे सगळं प्रकरण एवढ्यावरच थांबलं नाही तर होणाऱ्या सुनेसोबत सासऱ्यानेच लग्न केलं आणि तिला आपली पत्नी बनवली.
ADVERTISEMENT
दरम्यान, या संपूर्ण घटनेमुळे जा तरुणाचं लग्न होणार होतं त्याला आणि त्याच्या आईला मात्र खूप धक्का बसला आहे. कारण मुलाच्या वडिलांनीच अशा प्रकारचं कृत्य केलं आहे. त्यामुळे आता न्यायासाठी कोणाकडे दाद मागावी हेच त्यांना समजत नाही.
अल्पवयीन मुलाचं लग्न ठरवलं, पण सुनेसोबत सासराच गेला पळून.. नेमकं प्रकरण काय?
खरं तर सून ही मुलीसारखी असते, परंतु बरेच लोक नातेसंबंधांच्या मर्यादा ओलांडतात आणि नातेसंबंधांना काळीमा फासतात. रामपूरच्या बासनगली गावातही अशीच एक घटना घडली आहे. जिथे शकील नावाच्या एका व्यक्तीने आपल्या मुलाचे झबीना नावाच्या मुलीशी लग्न ठरवलं होतं.
हे ही वाचा>> 16 वर्षांच्या मेव्हणीवर जडला दाजींचा जीव, गरोदरही राहिली अन् घडली थरकाप उडवणारी घटना
मिळालेल्या माहितीनुसार, ज्या मुलाचं लग्न ठरविण्यात आलं होतं तो अल्पवयीन असल्याचं समजतं आहे. त्यामुळेच एवढ्या लवकर मुलाचं लग्न करू नये असं कुटुंबातील सदस्यांचं मत होतं. परंतु असा आरोप आहे की, शकीलने त्याची पत्नी शबाना आणि मुलांना मारहाण केली आणि त्यांच्यावर दबाव आणला आणि त्या मुलीशी लग्नासाठी तयार केलं.
पण ही गोष्ट इथेच संपली नाही. आपल्या मुलाचे जबरदस्तीने लग्न ठरवल्यानंतर शकील हा दिवसरात्र मोबाइलवर त्याच्या होणाऱ्या सुनेशी गप्पा मारायचा. कुटुंबातील सदस्यांनी विरोध केला तेव्हा त्याने त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. दरम्यान, सासरा आणि होणारी सून यांच्यातील प्रेमसंबंध इतके वाढले की, ही गोष्ट लग्न ठरलेल्या मुलापासून लपून राहिली नाही. त्यामुळे मुलाने लग्न करण्यास नकार दिला.
हे ही वाचा>> पती बनवत बसला हनिमूनचा प्लॅन, पत्नीचं सुरू होतं भलतीकडेच गुटर गुटर; बॉयफ्रेंडला बोलावलं अन्..
यानंतर अचानक शकील त्याच्या घरातील काही दागिने आणि पैसे घेऊन झबीनासोबत पळून गेला. त्याने त्याच्या भावी सुनेला आपली वधू बनवले. या घटनेमुळे त्याची पत्नी प्रचंड नाराज झाली. तर त्याच्या अल्पवयीन मुलाला या गोष्टीचा अधिक धक्का बला आहे की त्याच्या वडिलांनी असं का केलं?
आश्चर्याची गोष्ट म्हणजे शकीलच्या आई-वडिलांनी देखील त्याला त्याच्या भावी सुनेला वधू बनवण्यात खूप मदत केली. अशा परिस्थितीत, शकीलच्या पत्नीला, जी आपल्या मुलाचे लग्न लावून त्यांचा संसार फुलविण्याची स्वप्नं पाहत होती, तिला सूनऐवजी आता सवत मिळाली आहे. आता तिला फसवणूक झाल्यासारखे वाटते, पण तिला न्यायासाठी कुठे दाद मागावी हे समजत नाही.
ADVERTISEMENT
