विद्यार्थीनी शाळेत जाताना नराधम करायचा पाठलाग, पीडितेनं कंटाळून संपवलं जीवन

मुंबई तक

• 04:31 PM • 12 Sep 2026

Crime News : एका हायस्कूलमध्ये विद्यार्थिनीने गळफास घेत जीवन संपवल्याची दुर्दैवी घटना आहे. कुटुंबियांनी आरोप केला की, गावातील एक तरुण तिचा सतत छळ करायचा आणि तिचा पाठलाग करायचा. यानंतर विद्यार्थीनी अधिकच त्रासली होती. या प्रकरणात पोलिसांनी दोन्ही भावांविरोधात गुन्हा दाखल केला.

Crime News (AI Photo)

Crime News

Google CTA

बातम्या हायलाइट

point

विद्यार्थीनीचा नराधमाकडून सतत छळ 

point

मुख्य आरोपी नराधम नय्यूमला बेड्या 

Crime News : एका हायस्कूलमध्ये विद्यार्थिनीने गळफास घेत जीवन संपवल्याची दुर्दैवी घटना आहे. कुटुंबियांनी आरोप केला की, गावातील एक तरुण तिचा सतत छळ करायचा आणि तिचा पाठलाग करायचा. यानंतर विद्यार्थीनी अधिकच त्रासली होती. या प्रकरणात पोलिसांनी दोन्ही भावांविरोधात गुन्हा दाखल केला होता. यानंतर मुख्य आरोपींना ताब्यात घेण्यात आले होते. ही घटना उत्तर प्रदेशच्या अमरोहा येथील गजरोला क्षेत्रातील आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : वाशिम: कुख्यात गुंडाचा विहिरीत आढळला मृतदेह, 15 हून अधिक गुन्हे दाखल

विद्यार्थीनीचा नराधमाकडून सतत छळ 

मृत विद्यार्थीनी ही एका हायस्कूलमध्ये शिक्षण घेत आहे. कुटुंबियांनी आरोप केला की, गावातील रहिवासी नय्यूम नावाच्या एका तरुणाने पीडितेला सतत त्रास दिला होता. शाळेत येताना आणि जाण्यावेळी तो पीडितेला माग काढायचा आणि तिच्यासोबत सातत्याने छेडछाड करायचा, विद्यार्थीनी याच त्रासाला कंटाळून गेली होती. पीडितेनं कुटुंबाला याबाबत माहिती दिली होती. 

कुटुंबियांच्या माहितीनुसार, विद्यार्थिनीच्या तक्रारीनंतर त्यांनी या प्रकरणात आरोपीच्या कुटुंबाशी बोलण्याचा प्रयत्न केला. कुटुंबियांनी आरोप केला की, त्यांनी नय्यूमचा भाऊ नासिरकडून विद्यार्थीनीला सतत त्रास दिल्याची तक्रार केली. तक्रारीवरून नासिरने कुटुंबियांना शिवीगाळ देखील केली, नंतर धमकी दिली. कुटुंबीयांचं म्हणणे असंय की, तक्रारीनंतर विद्यार्थीनीला सतत त्रास दिला जातो. कुटुंबीयांच्या आरोपानुसार, विद्यार्थीनी या त्रासाला कंटाळून गेली होती. नंतर आरोपीने गळफास घेत जीवन संपवलं. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ माजली. 

मुख्य आरोपी नराधम नय्यूमला बेड्या 

विद्यार्थीनीच्या मृत्यूची माहिती मिळताच, गजरोला पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आमि शवविच्छेदनासाठी पाठवला होता. यानंतर प्रकरणाचा पुढील तपास सुरू केला. कुटुंबीयांनी दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी नय्यूम आणि त्याचा भाऊ नासिर विरोधात गुन्हा दाखल केला. नय्यूमला पोलिसांनी अटक केली आहे. 

हे ही वाचा : Astrology : 13 सप्टेंबरपासून बुध 'या' राशींसाठी लकी ठरणार

एसपी अमरोहा लखन सिंह यादवच्या माहितीनुसार, प्रकरणाची कारवाई केली जात आहे. त्याच आधारावर पुढील कारवाई केली जात आहे. दरम्यान, पोलीस या घटनेची संपूर्ण माहिती मिळवत आहे. शवविच्छेदनाच्या अहवालातून प्रकरणाची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात पुढील कारवाई केली जात आहे.