शाळेत पंख्यावरून वाद, चौथीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीला वर्गमित्रांनी ठार मारलं

मुंबई तक

25 Mar 2026 (अपडेटेड: 25 Mar 2026, 03:11 PM)

crime news : वास्तविक बघता, सहोरवा माध्यमिक शाळेतील इयत्ता चौथीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीला वर्गमित्रांनी मारहाण करत ठार केले. मृत विद्यार्थिनीचे नाव स्मृती कुमारी असे आहे. या घटनेनं परिसर हादरून गेल्याचे वृत्त आहे.

crime news

crime news

Google CTA

बातम्या हायलाइट

point

पंखा चालू करण्यावरून वाद

point

विद्यार्थिनीला मारहाण करत संपवलं

Crime News : बिहारमधील सीतामढी जिल्ह्यातील सोनबरसा ब्लॉकमधील सहोरवा माध्यमिक शाळेत एक धक्कादायक प्रकार घडला आहे. ही घटना ऐकून तुम्हालाही मोठा धक्का बसेल. वास्तविक बघता, सहोरवा माध्यमिक शाळेतील इयत्ता चौथीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीला वर्गमित्रांनी मारहाण करत ठार केले. मृत विद्यार्थिनीचे नाव स्मृती कुमारी असे आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : पुणे हादरलं, फिल्टरच्या विजेच्या धक्क्याने विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत, विद्यार्थ्यांमध्ये भीतीचं वातावरण

पंखा चालू करण्यावरून वाद

घडलेल्या घटनेनुसार, स्मृती पंखा चालू करण्यासाठी शाळेत गेली होती. परंतु तिच्या दोन वर्गमंत्रांनी तिला पंखा चालू करण्यावरून आक्षेप घेतला होता. याचदरम्यान त्यांच्यात वाद उफळला, नंतर मारहाणीत त्याचे रुपांतर झाले. मृत विद्यार्थिनीच्या कुटुंबीयांचा आरोप आहे की, त्या दोन विद्यार्थ्यांनी स्मृतीला निर्दयपणे मारहाण केली, ज्यात ती गंभीर जखमी झाली होती. 

विद्यार्थिनीला मारहाण करत संपवलं

संबंधित घटना ही सोमवारी घडल्याची माहिती आहे. मुलीला काही विद्यार्थिनींनी मारहाण केल्याची माहिती समोर आली आहे. मृत विद्यार्थिनीच्या वडिलांनी तात्काळपणे शाळेत धाव घेत पीडितेवर उपचारासाठी रुग्णालयात नेले, पण नंतर डॉक्टरांनी तिला दुसऱ्या रुग्णालयात जाण्यास सांगितले, त्याचदरम्यान वाटेतच पीडितेचा दुर्दैवी मृत्यू झाला. 

हे ही वाचा : लुडो खेळताना दीराने चिमटा काढला, वहिनी थेट रागीट असलेल्या पतीला फोन करणार...इतक्यात भयंकर घडलं

या घटनेनंतर मृत मुलीच्या आई वडिलांनी शिक्षकांवर निष्काळजीपणाचा आरोप केला आहे. मुलांनी मारहाणीची तक्रार दाखल करून या प्रकरणात हस्तक्षेप केला नाही.