हैवानाने महिलेवर लैंगिक अत्याचार केला, नंतर गुप्तांगात बाटली घालून दगडाने डोकं ठेचलं, क्रूरतेची परिसिमा ओलांडली

मुंबई तक

• 03:58 PM • 04 Apr 2026

crime news : एका महिलेवर लैंगिक अत्याचार करून तिचा मृतदेह फुटपाथवर आढळून आल्याचं सांगण्यात येतंय. संबंधित घटनेची माहिती पोलीसांना समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. नंतर सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून आरोपीला अटक करण्यात आली.

crime news

crime news

Google CTA

बातम्या हायलाइट

point

फुटपाथवर महिलेचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात

point

गुप्तांगात पाण्याची बाटली घालून केला आत्याचार

Crime News : देशात सरकार कोणतंही असो, पण महिलांवरील अन्याय-अत्याचार थांबायचं नाव घेत नाहीत. असाच एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका महिलेवर लैंगिक अत्याचार करून तिचा मृतदेह फुटपाथवर आढळून आल्याचं सांगण्यात येतंय. संबंधित घटनेची माहिती पोलीसांना समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. नंतर सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून आरोपीला अटक करण्यात आली. संबंधित प्रकरण हे छत्तीसगढ राज्यातील अंबिकापूर जिल्ह्यात घडले आहे.

हे वाचलं का?

हे ही वाचा : 35 वर्षीय महिला सरकारी कर्मचाऱ्याचे लैंगिक शोषण, HIV पॉझिटीव्ह सांगूनही नराधम ऐकेना... पीडितेच्या गुप्तांगावर हल्ला

फुटपाथवर महिलेचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात

3 एप्रिल रोजी पहाटे, महामाया मंदिर प्रवेशद्वाराजवळील फुटपाथवर महिलेचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला होता. अंबिकापूर कोतवाली पोलिसांनी या प्रकरणाची माहिती मिळताच, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी फॉरेन्सिक आणि श्वान पथकासह घटनास्थळी धाव घेतली आणि या प्रकरणाचा पोलीस पुढील तपास केला. दरम्यान, आरोपीने आधी महिलेवर अत्याचार केला आणि नंतर तिची हत्या केली. 

गुप्तांगात पाण्याची बाटली घालून केला आत्याचार

नराधमाने तिचा गळा दाबला आणि नंतर तिचे डोके ठेचून हत्या केली. डोकं ठेचल्याने, तिची ओळख पटू शकली नव्हती. एवढेच नव्हे तर आरोपीने तिच्या गुप्तांगात देखील पाण्याची बाटली घालून तिच्यावर अत्याचार केला होता. 

हे ही वाचा : Astrology : मेष राशीत सूर्य ग्रहाचा होणार प्रवेश, 'या' राशींचं काही खरं नाही...

महिलेसोबतच्या या क्रूरतेने सर्वच संतापले आणि स्थानिकांनी दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली होती. महिलेची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी जवळपासच्या रहिवाशांची चौकशी करत सीसीटीव्ही फुटेजचा तपास करत आहेत.