25 महिलांशी लग्न केले, 33 तोळे सोने अन् बरंच मोठं कांड

मुंबई तक

14 Jun 2026 (अपडेटेड: 14 Jun 2026, 04:01 PM)

Crime News : महाराष्ट्र पोलिसांनी कोट्यवधी रुपयांची फसवणूक करून 25 महिलांशी विवाह केल्याच्या गुन्ह्याखाली आरोपीला अटक केली. पोलिसांनी या प्रकरणात शुक्रवारी 12 जून 2026 रोजी सांगितलं की, आरोपी अनुज कुमार चंद्रप्रकाश त्रिदेवीला 24 मे रोजी मुसक्या आवळण्यात आल्या.

crime news

crime news

Google CTA

बातम्या हायलाइट

point

33 तोळे सोने घेऊन आरोपी घटनास्थळावरून फरार 

point

मुलीकडून एकूण 97 लाखांची चोरी

Crime News : महाराष्ट्र पोलिसांनी कोट्यवधी रुपयांची फसवणूक करून 25 महिलांशी विवाह केल्याच्या गुन्ह्याखाली आरोपीला अटक केली. पोलिसांनी या प्रकरणात शुक्रवारी 12 जून 2026 रोजी सांगितलं की, आरोपी अनुज कुमार चंद्रप्रकाश त्रिदेवीला 24 मे रोजी मुसक्या आवळण्यात आल्या. या घटनेनं पोलिसही हादरून गेले आहेत. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : घराला रंगकाम करण्यासाठी आले, महिलेला एकटं पाहून नको तेच अन्..

1 मार्च 2019 रोजी केला विवाह 

संबंधित प्रकरणात अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, आरोपीने अजय अग्रवाल, अदय संतोष सिंग आणि जयप्रकाश रमेशचंद्र अशी खोटी नावे सांगितली. संबंधित प्रकरणाची 75 वर्षीय महिलेने नयनगर पोलीस ठाण्यात या प्रकरणाची तक्रार दाखल केली. आरोपीने जाहिरातींचा आधार घेत 45 वर्षीय मुलीशी संपर्क साधला, तसेच तिच्याशी 1 मार्च 2019 विवाह झाला होता. 

33 तोळे सोने घेऊन आरोपी घटनास्थळावरून फरार 

संबंधित तक्रारीत म्हटलं की, आरोपीने महिलेच्या कुटुंबाला फ्लॅट विकण्यास जबरदस्ती केले. तसेच नवीन घर बांधून देण्याचे आश्वासन देखील दिले होते. हप्त्यांमध्ये एकूण 82 लाख रुपये रोख रक्कम घेतली होती, नंतर 22 फेब्रुवारी 2022 रोजी आरोपीने पीडितेच्या नातेवाईकांच्या लग्नाचे निमित्ताने दिल्लीत नेले आणि रेल्वे स्थानकावरून 33 तोळे सोने घेऊन घटनास्थळावरून फरार झाला होता. 

मुलीकडून एकूण 97 लाखांची चोरी

दरम्यान, आरोपीने महिलेला मुंबईला जाणाऱ्या रेल्वेत बसवून आपला फोन बंद केला आणि तिथून पळून गेला. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीने तक्रारदार आणि तिच्या मुलीकडून एकूण 97 लाखांची चोरी केली. तपासातून समोर आले की, आरोपीने 25 महिलांशी विवाह करून त्यांना निशाना बनवले, ज्यात दिव्यांग, मानसिकदृष्ट्या कमजोर, घटस्फोटित महिलांचा देखील या महिलांचा समावेश आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फसणूक केलेल्या लाखातून कार खरेदी केली होती. आरोपी अमरावतीच्या एका अन्य प्रकरणात आरोपीने कथितरित्या 25 लाख रुपयांची फसवणूक केली होती. तपासातून असेही उघडकीस आले की, मुलाने या फसवणुकीत मदत केली, त्यामुळे तोही सहआरोपी बनला. 

हे ही वाचा : नर्सकडून आधी नवऱ्याला घटस्फोट आणि मग मोठं कांड

पोलिसांनी सांगितलं की, आरोपीकडून एक बनावट आधारकार्ड, तीन मोबाईल फोन आणि एक एटीएम कार्ड जप्त करण्यात आले. दरम्यान, आरोपी हा सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.