12 वर्षांची मुलगी लघुशंकेसाठी उठली, दोघांनी मिळून बंदुकीचा धाक दाखवत जंगलात...

मुंबई तक

• 04:12 PM • 01 Jun 2026

Crime News : 12 वर्षीय मुलीचे दोन तरुणांनी अपहरण केले, नंतर जंगलात नेत बंदुकीचा धाक दाखवून तिच्यावर सामूहिक अत्याचार करण्यात आला. यानंतर तिच्या कुटुंबीयांच्या तक्रारीच्या आधारे संबंधित दोघांविरुद्ध एफआरआय दाखल करण्यात आला. 

Crime News

Crime News

Google CTA

बातम्या हायलाइट

point

12 वर्षांची मुलगी लघुशंकेसाठी उठली

point

पीडित मुलीवर सामूहिक अत्याचार

Crime News : उत्तर प्रदेशातील संभळच्या आसमोली पोलीस ठाणे परिसरात शौचास गेलेल्या 12 वर्षीय मुलीचे दोन तरुणांनी अपहरण केले, नंतर जंगलात नेत बंदुकीचा धाक दाखवून तिच्यावर सामूहिक अत्याचार करण्यात आला. यानंतर तिच्या कुटुंबीयांच्या तक्रारीच्या आधारे संबंधित दोघांविरुद्ध एफआरआय दाखल करण्यात आला. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : वही आणण्यासाठी मुलगा शिक्षकाच्या घरी गेला, 24 तासांतच कालव्यात भयंकर

12 वर्षांची मुलगी लघुशंकेसाठी उठली

संबंधित गावातील 12 वर्षांची अल्पवयीन मुलगी रविवारी रात्रीच्या सुमारास साडे दहा वाजता लघुशंकेसाठी उठली होती. मिळालेल्या माहितीनुसार, त्याच गावातील तरुण आपल्या मित्रासोबत तिथे आला, त्याने बंदुकीचा धाक दाखवून तिचे अपहरण केले आणि नंतर तिला जंगलात नेले. नंतर त्या दोघांनी तिच्यावर सामूहिक अत्याचार केला. 

पीडित मुलीवर सामूहिक अत्याचार

दरम्यान, पीडित मुलीवर सामूहिक अत्याचार केल्यानंतर ती बेशुद्धवस्थेत पडली होती. ते दोघेही बेशुद्ध अवस्थेत सोडून पळून गेले. कशीबशी ती मुलगी घरी पोहोचली आणि तिने आपल्या कुटुंबीयांना घडलेल्या घटनेबाबत सांगितलं. अशातच कुटुंबीयांनी पोलीस ठाणे गाठून आरोपी गोल्डी आणि त्याच्यासह इतर असलेल्या साथीदारांविरुद्ध एफआरआय दाखल केला. 

हे ही वाचा : मुंबई: मुलगा दुधासाठी रडत होता, वडिलांनी दिलं फेकून अन्.. स्वत: दारूच्या नशेत

महिला, मुलींवर अन्याय अत्याचाराच्या घटनेत मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. यामुळे महिला आणि मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. अशातच कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होताना दिसतेय.