मित्राची केली हत्या, नंतर मृतदेहासोबत सेल्फी काढला अन्..

मुंबई तक

• 07:24 PM • 06 Aug 2026

crime news : तरुणाला त्याच्या मित्रांनी मिळून संपवलं आणि मृतदेहासोबत सेल्फी घेतली आणि घटनास्थळावरून पळ काढला. नंतर सेल्फी काढलेला फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. या घटनेनं संपूर्ण शहर हादरून गेलं.

crime news

crime news

Google CTA

बातम्या हायलाइट

point

तरुणाला त्याच्या मित्रांनी मिळून संपवलं

point

मृतदेहासोबत सेल्फी घेतली

Crime News : तरुणाला त्याच्या मित्रांनी मिळून संपवलं आणि मृतदेहासोबत सेल्फी घेतली, त्यानंतर घटनास्थळावरून पळ काढला. आरोपींनी सेल्फी काढलेला फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. या घटनेनं संपूर्ण शहर हादरून गेलं. मृत तरुणाची अश्विन (वय 22) अशी ओळख समोर आली. मृत तरुण आणि हल्लेखोर हे तामिळनाडू येथील आहेत. ही घटना तामिळनाडूतील पोलाची येथील किनाथुकडावु परिसरातील आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : हॉलिवूड क्राईम सीरीज पाहून नवऱ्याने बायकोला तलवारीनं संपवलं, आत्महत्येचा रचना बनाव

मित्राची हत्या करून मृतदेहासोबत सेल्फी

सुरूवातीला तपासातून समोर आले की, रात्रीच्या सुमारास मित्रांमध्ये वाद झाला होता. याचदरम्यान वाद वाढत गेल्याने दोघांनी मिळून अश्विनची हत्या केली. या घटनेवर पोलिसांनी सांगितलं की, मर्डरनंतर आरोपींनी जे काही केलं ते पाहून पोलिसांना देखील धक्का बसला होता. हत्येनंतर दोन्ही आरोपींनी मृतदेहाजवळ हत्यारे ठेवली आणि एक सेल्फी काढला. नंतर तो फोटो त्यांच्या मित्रांना पाठवण्यात आला आणि नंतर ते घटनास्थळावरून फरार झाले. 

संबंधित प्रकरणाचा व्हिडिओ देखील समोर आला, या व्हिडिओमध्ये आरोपी मृतदेहावर हातोड्याने मारहाण करताना दिसताहेत. ही संपूर्ण घटना चित्रित करण्यात आली. पोलीस व्हिडिओची चौकशी करत असून तो कोणी चित्रीत केला आणि कोणाला पाठवण्यात आला होता, याचा शोध घेणं सुरू केलं आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर किनाथुकडावू पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी अश्विनचा मृतदेह घटनास्थळावरून ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आला होता. 

हत्येमागील नेमका होतू काय?

पोलिसांच्या माहितीनुसार, घटनेपासून आरोपी फरार असून त्यांचा शोध घेणं सुरू आहे. या हत्येमागील नेमका होतू काय? याचा पोलीस तपास करत आहेत. प्राथमिक तपासातून मित्रांमध्ये वाद असल्याचा संशय व्यक्त करण्यात येतो. पोलिसांनी सोशल मीडियावर शेअर केलेले फोटो आणि व्हिडिओची तपासणी केली जात आहे. या डिजिटल पुराव्याच्या आधारे आरोपींना तात्काळपणे अटक करण्याचा अधिकाऱ्यांचा प्रयत्न केला. व्यक्तींना हे फोटो आणि व्हिडिओ पाठवण्यात आले होते, त्यांचाही तपास सुरू ठेवण्यात आलाय. 

हे ही वाचा : 'क्या बोलती पब्लिक', नावाने देशव्यापी अभियान, कॉकरोज जनता पार्टीची पुढची दिशा ठरली

हत्येनंतर साथीदारांनी तरुणाचा खून करून त्याच्यासोबत सेल्फी काढली, नंतर तो फोटो सोशल मीडियावर शेअर केल्याचा आरोपांमुळे स्थानिकांना मोठा धक्का बसला होता. या प्रकरणी एकूण तपास सुरू ठेवण्यात आलाय.