Washim Crime : जका खान - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी वाशिमच्या लेट गोविंदराव देशपांडे कॉलेजमध्ये घुसून धिंगाणा घातला. अधिकारी असल्याचं सांगत लाखो रुपये उकळल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी मनसेच्या तीन पदाधिकाऱ्यांसह इतर चार जणांविरोधात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करत 4 ऑगस्ट रोजी अटक करण्यात आली.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : नागपूर: 16 वर्षीय मुलीवर अत्याचार, आरोपीकडून तुरूंगातून पिज्जा बर्गरची मागणी, म्हणाला..
नर्सिंग कॉलेजचे संस्थाचालक डॉ. शेख तसलीम यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटलं की, मौलाना आझाद शिक्षण प्रसारक मंडळ संचलित लेट गोविंदराव देशपांडे कॉलेज आणि नर्सिंग येथे एम.एस.बी, एन. पी. बी. मंडळानुसार नर्सिंगची परीक्षा पारदर्शक, सीसीटीव्हीच्या देखरेखीत आणि कॉपीमुक्त वातावरणात सुरू होती.
मनसेचे पदाधिकारी परीक्षा केंद्रात घुसले
28 जुलै 2026 रोजी सकाळी 11:30 वाजण्याच्या सुमारास मनसेचे पदाधिकारी आकाश सुनील लोलप (वय 32) राजेंद्र, राजेंद्र किडसे (वय 55), उमेश टोलमारे आणि इतर दोन अनोळखी व्यक्तींविरोधात अशा एकूण 5 जणांविरुद्ध परीक्षा केंद्रात बेकायदेशीरपणे घुसले होते. नंतर विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकांची आणि पेपरची बेकायदेशीरपणे झडती घेतली होती. तसेच पर्यवेक्षक, केंद्रप्रमुख आणि बोर्डाच्या परीक्षकांना तुमची नियुक्ती कोणी केली? तुमचे शिक्षण किती? असा उलट सवाल करण्यात आले होते. पेपर आदल्यादिवशी फुटला आहे, असा खोटा आरोप करत आरडाओरड केली.
परीक्षा केंद्रात भीतीचे वातावरण
या प्रकरणामुळे परीक्षेच्या मोक्याच्या वेळी विद्यार्थिनींचे मन विचलित होऊन परीक्षा केंद्रावर भीतीचे आणि दहशतीची वातावरण निर्माण झाले होते. परीक्षा केंद्रावर दहशतीचं वातावरण निर्माण झाल्याने आरोपींनी संस्था चालकाला विश्रामगृहावर बोलावून धमकी देण्यात आली की, वाशिम शहरात सुखाने राहायचे असल्याचे, तसेच शाळा कॉलेज चालवायचे असल्यास, आमचे समाधार करावे लागेल.
हे ही वाचा : NCPची युवती, फार्महाऊसवर शारीरिक संबंध आणि झेडपीच्या सभेत गोंधळ
त्यानंतर आरोपींनी परीक्षा केंद्रातील सीसीटीव्ही फुटेजचे चुकीच्या पद्धतीने एडीट केलेले व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करून संस्थेची प्रचंड बदनामी करण्यात आली होती. याच बदनामीच्या पार्श्वभूमीवर आरोपींनी प्रकरण शांत करण्यासाठी पुढील पेपर सुरळीतपणे पार पाडण्यासाठी सुरूवातीला 5 लाख रुपयांची मागणी करण्यात आली.
ADVERTISEMENT












