दीराचा विवाह ठरल्याचं समजताच वहिनीची अचानकपणे सटकली, त्याचं गुप्तांगच छाटलं, नेमकं काय घडलं?

Crime News : वहिनीने आपल्या दीराला एका खोलीत बोलावले आणि त्याचा प्रायव्हेट पार्टच छाटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला.

crime news

crime news

मुंबई तक

• 08:00 AM • 01 Nov 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

वहिनीने दीराला खोलीत बोलावत गुप्तांग छाटलं

point

धक्कादायक कारण आलं समोर

Crime News : वहिनीने आपल्या दीराला एका खोलीत बोलावले आणि त्याचा प्रायव्हेट पार्टच छाटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. जखमी झालेल्या दीराला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सध्या तरुणाची परिस्थिती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर त्या तरुणाला दिल्ली येथे उपचार घेण्यास सांगितले. ही घटना सोमवारी रात्री उशिरा बरहानच्या खेडी आडू गावात घडली. रात्री वहिनीने तिच्या दीराचे गुप्तांग कापले, ज्यामुळे त्याला रक्तस्त्रावाला सामोरं जावं लागलं. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : मोदींचा भक्त म्हणणाऱ्या महेश कोठारेंवर संजय राऊत यांची बोचरी टीका, म्हणाले, 'तात्या विंचू येऊन गळा दाबेल'

वहिनीने दीराला खोलीत बोलावत गुप्तांग छाटलं

महिलेचा दीर हा हल्द्वानी स्थित येथील सिमेंट केमिकल कंपनीत असिस्टंट इंजीनिअर आहे. दिवाळी सणासाठी तो रविवारी घरी आला होता. सोमवारी लक्ष्मी पूजनानंतर योगेश झोपला होता. त्याची वहिनी आपल्या तीन मुलांसह झोपली होती. तेव्हा वहिनीने आपला दीर योगेशला खोलीत बोलावले आणि त्याचं गुप्तांग छाटलं. या घटनेची माहिती मिळताच, अर्चनाचा पती घटनास्थळी दाखल झाला. तेव्हा महिलेचा पती आगरा येथे मजूरीचं काम करत होता. 

'त्या' कारणावरून गुप्तांग छाटलं

महिला देखील त्याच्यासोबत राहत होती. रविवारी ती आपल्या गावी आली होती. परिस्थिती बिघडल्यानंतर महिलेनं आपल्या पतीला सूचना दिली. वहिनीच्या लहान बहिणीचं योगेशसोबत अनेकदा बोलणं होतं. ती आपल्या बहिणीचा विवाह हा योगेशसोबत व्हावा असं म्हणत होती.

हे ही वाचा : FB वरून महिलेशी केली मैत्री, अडीच वर्षे केले लैंगिक शोषण, मुलासह नवऱ्यालाही... रायगड हादरलं!

पण, योगेशचा विवाह मौनिपूर येथील एका व्यक्तीशी ठरलं होतं. त्याचा नोव्हेंबर महिन्यात विवाह होणार असल्याचे निश्चित झाले. वहिनीला ही गोष्ट आवडली नसल्याने तिने गुन्हा केला. त्यानंतर गंभीर अवस्थेत योगेशला आग्रा येथील एका मेडिकल कॉलेज येथे दाखल करण्यात आले. त्यानंतर पुरावे गोळा करण्यासाठी फॉरेन्सिक पथकाने तपास सुरु केला. 

    follow whatsapp