crime news : गुजरातच्या अहमदाबाद येथील एका कौटुंबिक हिंसाचाराला महिला बळी पडली आहे. पतीने आपल्याच पत्नीवर संशय व्यक्त करत, तु कशावरून प्रामाणिक आहेस असा जाब विचारला. त्यानंतर महिलेचा हात उकळत्या तेलात टाकला आणि नंतर ती ओरडू लागली म्हणून जीवे मारण्याची धमकी देखील दिली होती. या संबंधित प्रकरणात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये पत्रकारांवर गुंडांकडून प्राणघातक हल्ला, अपोलो रुग्णालयात उपचार सुरु, नेमकं काय घडलं?
नणंदेनं कट रचत...
टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, 28 वर्षीय एका महिलेचा हात उकळत्या तेलात टाकला होता. पीडित महिलेच्या प्रामाणिकपणावर प्रश्न उपस्थित करत तिच्यासोबत असं क्रूर कृत्य केलं होतं. संबंधित घटनेचा कट हा पतीच्या बहिणीने म्हणजेच नणंदेनं रचला होता. ही घटना 16 सप्टेंबर रोजी मेहसाणातील विजापुर येथील गोरिटा गावात घडली होती.
चुलीवरील उकळत्या तेलातच...
संबंधित प्रकरणात एफआरआय दाखल करण्यात आल्यानंतर 13 वर्षांपासून विवाहित असलेल्या पीडितेनं पोलिसांना सांगितलं की, मी नकार दिल्यानंतर मला अनेकदा मारहाण करण्यात आली होती. त्यानंतर मला एवढ्या जोरात ढकलले गेले की, माझा हात चुलीवरील उकळत्या तेलातच गेला. तेव्हा किंकाळ्या थांबत नसून नणंदेनंच तेलाचे भांडे उचलले आणि तिच्या उजव्या पायावर गरम तेल ओतले.
हे ही वाचा : 'तुझा मुळशी पॅटर्नच करीन...', आधी बरकडीवर अन् नंतर करंगळीवर धारदार शस्त्राने केले वार, नंतर मोटारसायकने केला पाठलाग...
त्यानंतर पीडितेनं अनेकदा आरडाओरड केली असता, जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती, असे महिलेनं संबंधित तक्रारीत नमूद केले होते. तिने आरडाओरड केल्यानंतर आजूबाजूचे लोक घटनास्थळी दाखल झाले होते. त्यानंतर तिला एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेल्या काही महिन्यांपासून पीडितेसोबत गैरवर्तन करण्यात आले होते, असे महिलेनं पोलिसांना सांगितलं.
ADVERTISEMENT











