Crime News : तरुणाने बर्थडे पार्टीचा बहाणा करत तरुणीला घरी बोलावून लैंगिक अत्याचार केला. नंतर लग्नाचं आमिष दाखवून दुसऱ्यांदा तिच्यावर शरीरसंबंध ठेवले आणि अचानकपणे लग्नास नकार देऊन तिच्याकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी तरुणाला अटक केली. ही घटना बंगालच्या कोलकातामधील जादवपुर परिसरातील आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : रॅपिडो चालकाचे अश्लील कृत्य, 'तसले' व्हिडिओ पाहताना महिला प्रवाशानं रेड हँड पकडलं
घडलेल्या घटनेतील आरोपीची अनुभव भट्टाचार्य अशी ओळख समोर आल्याची पोलिसांची माहिती आहे. पोलिसांनुसार, पीडित तरुणी ही आरोपी अनुभवच्या ओळखची होती, दोघे एकमेकांचे चांगले मित्र होते. नंतर दोघांमधील बोलणं वाढत गेलं आणि मैत्रीचं नात्यात रुपांतर झालं.
वाढदिवसाचं कारण सांगून तरुणीला घरी बोलावलं
पुढे पोलिसांच्या माहितीनुसार, नंतर दोघांनी एकमेकांचे फोन नंबर मिळवून एकमेकांशी बोलू लागले होते. दोघेही अनेकदा एकमेकांना भेटले होते. नंतर अनुभवने तरुणीला वाढदिवसाचं कारण सांगून घरी बोलावलं. जेव्हा तरुणी घरी पोहोचली असता, फ्लॅटमध्ये केवळ अनुभवच उपस्थित होता.
लग्नाचे आमिष दाखवून तरुणीसोबत दुसऱ्यांदा शरीरसंबंध
संबंधित प्रकरणात असा आरोप करण्यात आला की, तरुणीवर अनुभवने शरीरसंबंध ठेवण्यास जबरदस्ती केली. यानंतर त्याने तरुणीला लग्नाचे आमिष दाखवले, नंतर पीडितेवर दुसऱ्यांदा लैंगिक अत्याचार केला होता. बिजनेस करण्याच्या नावाने आरोपीनं पीडितेकडून 1.5 लाख रुपये उकळले.
हे ही वाचा : अभिनेत्री त्रिशाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप, उदयनिधी स्टॅलिन यांना अटक
काही वेळानंतर आरोपी अनुभवने पीडितेपासून राहण्याचा निर्णय घेतला होता. हळू हळू बोलणं पूर्ण बंद केलं होतं. या नंतर तरुणीने अनुभवविरोधात लिखित तक्रार दाखल केली.
ADVERTISEMENT












