Crime News : बंगळुरूत एक अतिशय धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका तरुणाला त्याच्याच लिव्ह इन पार्टनर तरुणीने वेगळे राहण्यास सांगितले. सुरुवातीला या प्रकरणामुळे दोघांमध्ये मोठा वाद झाला होता. त्यानंतर रागाच्या भरातच त्या तरुणाने आपल्या लिव्ह इन पार्टनरच्या अंगावर पेट्रोल ओतले आणि तिला जाळल्याची मन सुन्न करून टाकणारी घटना 30 ऑगस्ट रोजी इलेक्ट्रॉनिक सिटी पोलीस ठाणे परिसरात घडली. मृत झालेल्या तरुणीचं नाव वनजक्षी असे आहे. तर तिचा आरोपी लिव्ह इन पार्टनर हा कॅब ड्रायव्हर असून त्याचं नाव विठ्ठल (वय 52) असे आहे. संबंधित प्रकरणात त्याला अटक करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : जरांगेंची मागणी पूर्ण होऊ शकते का? जर उत्तर 'हो' असेल, तर मराठा समाजाला नेमकं किती मिळेल आरक्षण?
नेमकं काय घडलं?
बंगळुरु पोलिसांनी सोमवारी सांगितलं की, एका 35 वर्षीय महिलेला तिच्या लिव्ह-इन पार्टनरपासून वेगळं राहण्याची किंमत तिला आयुष्यभरासाठी भोगावी लागली आहे. दोघांमधील टोकाच्या वादानंतर आरोपीने महिलेवर पेट्रोल ओतून जाळले. अशातच महिलेचा मृत्यू झाल्याची घटना आता समोर आली आहे.
प्राथमिक तपासाचा हवाला देत एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं की, विठ्ठलला दारूचं व्यसन होतं. त्याने चार-पाच वर्षांपूर्वी रिलेशनशीपमध्ये येण्यापूर्वीच त्याचा विवाह झाला होता. दारूच्या नशेत तो तरुणीला सतत छळायचा, अखेर तरुणी त्याला सोडून गेली. त्यानंतर तिने मरियाप्पा नावाच्या दुसऱ्याच पुरुषाशी मैत्री केली.
पेट्रोल ओतून गाडी पेटवली
ज्या दिवशी ही घटना घडली होती तेव्हा विठ्ठलने वनजक्षीच्या गाडीचा पाठलाग केला. तेव्हा मरियाप्पासोबत तरुणी मंदिरातून बाहेर आली. त्यानंतर एका ट्राफिक सिग्नलवर गाडी थांबवली आणि त्यावर पेट्रोल ओतले. या घटनेचा कोणालाही सुगावा होऊ नये यासाठी त्याने लाईटरचा वापर करून गाडीच पेटवून दिली.
हे ही वाचा : सप्टेंबर महिन्यातील 'या' तारखेपासून ग्रहण योग, काही राशींना मिळणार धोका, काय सांगतं राशीभविष्य?
दरम्यान, एक व्यक्ती तरुणीच्या मदतीला धावून आला आणि कापड्याद्वारे आग विझवण्याचा प्रयत्न केला. हे पाहून इतर काही लोकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी सांगितलं की, महिलेला सुमारे 60 टक्के भाजलेल्या अवस्थेत रुग्णालयात नेण्यात आले आणि नंतर तिचा मृत्यू झाला.
ADVERTISEMENT
