Murder Case: उत्तर प्रदेशाच्या फिरोजाबाद जिल्ह्यातील जसराणा पोलीस स्टेशन परिसरात एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. येथील नगला जाट गावात एका वडिलांनी तिच्या मुलीची हत्या केल्याचं समोर आलं आहे. 19 ऑगस्ट रोजी 17 वर्षीय नेहाचा मृतदेह शेतात आढळला, त्यानंतर पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. कौटुंबिक सन्मानाचा प्रश्न हेच हत्येमागचं कारण असल्याचं पोलिसांच्या तपासात समोर आलं. प्रकरणातील 17 वर्षीय तरुणी 12 वीत शिकत असल्याची माहिती आहे.
ADVERTISEMENT
रागाच्या भरात मुलीची हत्या...
पोलिस तपासानुसार, नेहाचे शेजारच्या गावातील एका तरुणाशी प्रेमसंबंध होते. ती त्या दिवशीच्या रात्री तिच्या प्रियकराला भेटायला गेली होती. दरम्यान तिचे वडील इंद्रपाल मुलीला शोधत त्या ठिकाणी पोहोचले आणि आपल्या मुलीला आक्षेपार्ह स्थितीत पाहून ते प्रचंड संतापले. आपल्या मुलीला तिच्या प्रियकरासोबत पाहून रागाच्या भरात त्यांनी नेहाच्या मानेवर कुऱ्हाडीने वार करून तिची हत्या केली. घटनेनंतर इंद्रपाल घरी परतला आणि जणू काही घडलेच नाही अशा प्रकारे झोपी गेला. सकाळी गावकऱ्यांनी शेतात नेहाचा मृतदेह पाहिला आणि त्यांनी या प्रकरणाची माहिती पोलिसांना दिली.
हे ही वाचा: जावई आणि दाजीसोबतच सासूचे अनैतिक संबंध! पतीला कळालं म्हणून शेतात नेलं अन्...
थोट्या अभिमानाच्या नावाखाली उचचलं पाऊल...
त्यानंतर, पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी वडील इंद्रपाल यांना अटक केली. तसेच, हत्येत वापरलेली कुऱ्हाडही जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. अतिरिक्त पोलिस अधीक्षकांच्या म्हणण्यानुसार, इतर पुरावे गोळा केले जात असून प्रकरणात कायदेशीर कारवाई सुरू आहे. त्यांच्या मते, हा एक भयंकर गुन्हा असून एका वडिलांनी खोट्या अभिमानाच्या नावाखाली आपल्या मुलीची हत्या केली. या प्रकरणाची सखोल चौकशी केली जात आहे.
हे ही वाचा: ‘दोन शून्यां’ची बेरीज केली आणि त्यावर कितीही शून्ये जोडली तरी..' भाजप नेत्यानं ठाकरेंना डिवचलं
या प्रकरणामुळे गावात एकच खळबळ उडाली आहे. गावकऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे, इंद्रपालचे वर्तन नेहमीच संशयास्पद होतं, परंतु तो त्याच्या मुलीविरुद्ध असं पाऊल उचलेल, याची कोणाचीच कल्पना नव्हती. नेहाचे कुटुंबीय आणि गावकऱ्यांमध्ये शोककळा पसरली असून पोलीस या प्रकरणातील सर्व बाजूंचा तपास करत असल्याचं सांगण्यात येत आहे.
ADVERTISEMENT
