Delhi building collapse : आपली मुलगी 'एकता' हिने डॉक्टर व्हावे, असे एका सामान्य शेतकऱ्याचे त्याची मुलगी असे एक मोठे स्वप्न होते. हे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी एकताचे वडील रमेश चंद यांनी पाच वर्षांपूर्वी आपल्या मालकीच्या जमिनीचा काही हिस्सा विकला होता. मुलीने पांढरा कोट घालून रुग्णांची सेवा करावी आणि कुटुंबाचे नशीब बदलावे, या आशेने त्यांनी आपल्या सर्व बचतीचा गुंतवणूक म्हणून वापर केला होता. मात्र, नियतीला काही वेगळेच मंजूर होते. दक्षिण दिल्लीतील साकेत जवळील सैदुलजाब भागात शनिवारी रात्री झालेल्या चार मजली इमारत कोसळली. यामध्ये एकताचा दुर्दैवी अंत झाला आणि कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
ADVERTISEMENT
हेही वाचा : Pune Metro | NCP मध्ये खऱ्या अर्थाने 'पार्थ पर्व'ला सुरुवात; काकडेंच्या उमेदवारीची Inside Story
वडिलांशी फोनवर बोलली अन् नंतर ...
एकता केवळ 24 वर्षांची होती. शनिवारी दुपारी तिने आपल्या वडिलांशी फोनवर सुमारे 15 मिनिटे संवाद साधला होता. ती खूप आनंदी होती, असे रमेश चंद यांनी सांगितले. मात्र, त्याच रात्री 9 वाजता त्यांना एकताच्या एका मित्राचा फोन आला की ती राहत असलेल्या भागातील एक इमारत कोसळली आहे. एकता जेवणासाठी बाजूच्याच 'आंटी वाला किचन' कॅन्टीनमध्ये गेली असताना ही दुर्दैवी घटना घडली. ही बातमी मिळताच रमेश चंद यांनी राजस्थानमधील अलवारमधून दिल्लीकडे धाव घेतली, परंतु नियतीने त्यांच्या मुलीला त्यांच्यापासून हिरावून नेले होते.
हेही वाचा : Astrology : 12 वर्षानंतर गजलक्ष्मी राजयोगाचा 'या' राशींवर मोठा प्रभाव
FMGE ची करत होती तयारी
एकताचा शैक्षणिक प्रवास अत्यंत संघर्षाचा होता. 2020 मध्ये जेव्हा तिला परदेशात वैद्यकीय शिक्षण घेण्याची संधी मिळाली, तेव्हा आर्थिक टंचाई असूनही वडिलांनी आपली जमीन विकून तिचा खर्च उचलला. तिने पाच वर्षांचा एमबीबीएस (MBBS) अभ्यासक्रम किर्गिस्तानमध्ये पूर्ण केला होता. शिक्षण पूर्ण करून ती भारतात परतली होती आणि गेल्या एक वर्षापासून दिल्लीत 'फॉरेन मेडिकल ग्रॅज्युएट एक्झामिनेशन' (FMGE) या परवाना परीक्षेची तयारी करत होती. डॉक्टर होण्याचे तिचे ध्येय आता पूर्णत्वाकडे जात असतानाच, साकेत जवळील इमारत दुर्घटनेने तिचे आणि तिच्या कुटुंबाचे सर्व स्वप्न क्षणार्धात धुळीस मिळवले.
एकता तिच्या कुटुंबाचा केंद्रबिंदू होती. ती घरापासून शेकडो किलोमीटर दूर दिल्लीत राहत असली, तरी वडिलांचे तिच्यावर खूप प्रेम होते. गावातील कोणीही विद्यार्थी दिल्लीला जात असे, तर रमेश चंद त्यांच्यासोबत एकतासाठी घरचे तूप, मिठाई आणि तिचे आवडते पदार्थ पाठवत असत, जेणेकरून तिला घरच्या प्रेमाची उणीव भासू नये.
दुर्घटनेच्या ठिकाणी बचाव पथकाने जेव्हा एकताचा मृतदेह बाहेर काढला, तेव्हा उपस्थितांचे हृदय हेलावले. ज्या वडिलांनी मुलीला डॉक्टर बनवण्यासाठी आपली जमीन विकली, त्यांना आज आपल्या मुलीचा मृतदेह घेऊन परतण्याची दुर्दैवी वेळ आली आहे. ही घटना दिल्लीतील इमारत सुरक्षिततेच्या प्रश्नावर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह उभे करत आहे.
ADVERTISEMENT











