Suicide News : एका महिलेला अमेरिकेचा व्हिसा देण्यास नाकारल्याने तिनं टोकाचं पाऊल उचललं आहे. नैराश्यात येऊन महिलेनं हैदराबादमध्येच आत्महत्या केल्याची मन हेलावून टाकणारी घटना आहे. ही महिला मूळची आंध्र प्रदेशातील गुंटूर जिल्ह्यातील आहे. फ्लॅटमध्ये तिने कसलाही प्रतिसाद दिला नसल्याने कुटुंबाने दरवाजा तोडला असता, घरात तिचा मृतदेह आढळला. ही घटना 22 नोव्हेंबर रोजी घडली होती. आत्महत्या केलेल्या डॉक्टरचे नाव व्हि. रोहिणी असे आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : शनि आणि चंद्राचे विषारी संयोजन, काही राशीतील लोकांना अडचणीचा सामना करावा लागणार
झोपेच्या गोळ्या किंवा इंजेक्शन घेतल्याचा संशय
डॉ. रोहिणी यांनी शुक्रवारी रात्री झोपेच्या गोळ्या घेतल्या असाव्यात किंवा इंजेक्शन घेतल्याचा संशय असल्याची प्राथमिक माहिती पोलीस अधिकाऱ्याने दिली. शवविच्छेदनाचा अहवाल अद्यापही कळू शकलेला नाही, अशातच पोलीस त्याची वाट बघत आहेत. त्यातूनच खरं काय ते सर्वांसमोर येईल.
सुसाईड नोटमध्ये व्हिसाचा अर्ज नाकारल्याचे नमूद
घरात एक चिठ्ठी सापडली असून, त्यात ती नैराश्यात असल्याचे सुसाईड नोटमध्ये लिहिल्याचे आढळले. त्यात व्हिसाचा अर्ज नाकारल्याचे नमूद करण्यात आले होते. या सुसाईड नोटमुळे महिलेनं आत्महत्या केल्याचा अधिक संशय चिल्कलगुडा पोलिसांना आला होता.
हे ही वाचा : दुकानदाराकडे नाश्ता केला, पैशांची मागणी केल्यास चाकूने केले सपासप वार, धक्कादायक कांड
माझ्या मुलांनी अमेरिकेत जाऊ नये असे मला वाटते. अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेत भारतीयांचे योगदान हे मोठे आहे. मग ते आपला प्रवेश का नाकारत आहेत? असा प्रश्न देखील त्यांनी केला. माझा मुलगा देखील डॉक्टर आहे, त्याने कधीही अमेरिकेत जाऊ नये, असे मृत डॉक्टर रोहिणी यांच्या आईने म्हटलंय.
ADVERTISEMENT











