बीड हादरलं! सासरवाडीत राहणाऱ्या जावयाचा कोणी केला निर्घृण खून? थेट काढला कोथळा..

बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील तालखेड येथे सासरवाडीत राहत असलेल्या 33 वर्षीय युवकाची अत्यंत निर्घृण पद्धतीने हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

horrific incident in beed who brutally murdered son-in-law living at his in-laws house his entrails were literally ripped out

जावयाचा कोणी केला निर्घृण खून?

मुंबई तक

• 10:36 PM • 29 Jun 2026

follow google news

रोहिदास हातागळे | बीड: बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील तालखेड येथे सासरवाडीत राहत असलेल्या 33 वर्षीय युवकाची अज्ञातांनी अत्यंत निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी उघडकीस आली. मृताच्या गळ्यावर, पोटावर आणि डोक्यावर तीक्ष्ण हत्याराने अनेक वार करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. मृताच्या पोटावर अत्यंत जोरदारपणे वार करून त्याचा कोथळाच बाहेर काढण्यात आला आहे. दरम्यान, या भीषण हत्येमुळे तालखेड परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

हे वाचलं का?

शेतात जातो सांगून पडलेला घरातून बाहेर 

मृत युवकाचे नाव विकास दत्तात्रय वाघमोडे (रा. किट्टी आडगाव) असे आहे. काही वर्षांपूर्वी त्याने तालखेड येथील अरुण नारायण राऊत गुरव यांच्या मुलीशी प्रेमविवाह केला होता. सासू-सासऱ्यांचे निधन झाल्यानंतर विकास वाघमोडे हा गेल्या पाच वर्षांपासून सासरवाडीतच राहत होता. तो सासरच्या शेतीची देखभाल करण्याची जबाबदारी सांभाळत होता.

हे ही वाचा>> 3 नराधमांनी तरुणीला हॉटेलवर नेलं, पीडिता नग्नावस्थेत... व्हिडिओ व्हायरल

रविवारी सकाळी तो नेहमीप्रमाणे शेतात जात असल्याचे सांगून घरातून बाहेर पडला. मात्र, रात्री उशिरापर्यंत तो घरी परतला नाही. त्यामुळे त्याच्या पत्नीसह नातेवाईकांनी त्याचा शोध सुरू केला. परिसरात शोधमोहीम राबवूनही विकासचा काहीच मागमूस लागला नाही.

रक्तबंबाळ अवस्थेत आढळला मृतदेह 

सोमवारी सकाळी तालखेडजवळील खंडोबा वडी परिसरात विकास वाघमोडे याचा रक्तबंबाळ अवस्थेतील मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला आणि पुढील तपास सुरू केला.

गळा, पोट आणि डोक्यावर तीक्ष्ण हत्याराचे वार

प्राथमिक तपासात मृताच्या गळ्यावर, पोटावर आणि डोक्यावर तीक्ष्ण हत्याराने अनेक वार करण्यात आल्याचे समोर आले आहे. जखमांचे स्वरूप पाहता अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने हत्या करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास सुरू असून, अज्ञात आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून पथके कार्यरत करण्यात आली आहेत.

हे ही वाचा>> बायकोच्या पोटात बाळ, डोहाळे जेवणादरम्यान नवऱ्याचा संशय, DNA ची मागणी अन्..

जुन्या वादाची चर्चा, मात्र पोलिसांचा दुजोरा नाही

घटनेनंतर तालखेड परिसरात हा खून जुन्या वादातून झाल्याची चर्चा सुरू आहे. मात्र, पोलिसांनी अद्याप या चर्चेला कोणताही अधिकृत दुजोरा दिलेला नाही. तपास पूर्ण होईपर्यंत हत्येमागील कारण स्पष्टपणे सांगता येणार नसल्याचे पोलिसांकडून सूचित करण्यात आले आहे.

ग्रामीण पोलिसांकडून तपास सुरू

या प्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती. पोलीस विविध शक्यतांचा तपास करत असून, आरोपींचा शोध घेण्यासाठी पुढील तपास वेगाने सुरू आहे.