ज्योतिषाकडून ब्रेन वॉश, मुलीने स्वत:च्या आईला झोपेत असतानाच संपवलं, नैसर्गिक मृत्यूचा बनाव रचला

मुंबई तक

13 Feb 2026 (अपडेटेड: 13 Feb 2026, 10:32 AM)

Crime News : अंधश्रद्धेला बळी पडून लोक कोणत्या थराला जातील हे सांगता येत नाही. एका 33 वर्षीय महिलेने आपल्या आईची उशीने तोंड दाबून हत्या केल्याचे उघड झाले आहे. यामागचे कारण  ऐकून सगळेच अवाक झाले. एका ज्योतिषाने तिला सांगितले की, तिच्या आईने केलेल्या काळ्या जादूमुळे तिच्या वडिलांचा मृत्यू झाला आहे. ज्योतिषाने हे सांगताच मुलगी संतापली अन् तिने आपल्या आईलाच संपवले.

Crime News

Crime News

Google CTA

बातम्या हायलाइट

point

ज्योतिषाने दिला सल्ला, मुलीने आईचा जीव घेतला

point

गावकऱ्यांनी काय केलं?

Crime News : अंधश्रद्धेला बळी पडून लोक कोणत्या थराला जातील हे सांगता येत नाही. एका 33 वर्षीय महिलेने आपल्या आईची उशीने तोंड दाबून हत्या केल्याचे उघड झाले आहे. यामागचे कारण  ऐकून सगळेच अवाक झाले. एका ज्योतिषाने तिला सांगितले की, तिच्या आईने केलेल्या काळ्या जादूमुळे तिच्या वडिलांचा मृत्यू झाला आहे. ज्योतिषाने हे सांगताच मुलगी संतापली अन् तिने आपल्या आईलाच संपवले. पुष्पावती (55) असं मृत महिलेचं नाव असून कर्नाटकातील तुमकूर जिल्ह्यातील ही घटना आहे.

हे वाचलं का?

हे ही वाचा : दोन मुलांचा बाप असूनही दया-माया दाखवली नाही, विकृताने चिमुकलीला दातांनी इतकं छळलं की कोमात गेली

वडिलांच्या मृत्यूचा सूड

सुचित्रा असं आरोपी महिलेचं नाव आहे. सुचित्राच्या वडिलांचे दीड वर्षापूर्वी निधन झाले होते. याचा तिला मोठा धक्का बसला होता. वडिलांच्या मृत्यूचे नेमके कारण जाणून घेण्यासाठी तिने एका ज्योतिषाचा सल्ला घेतला. यावेळी त्या ज्योतिषाने 'तुझ्या आईने जादूटोणा केल्यामुळेच तुझ्या वडिलांचा मृत्यू झाला,' असे सुचित्राला सांगितले. ज्योतिषाच्या या दाव्यावर सुचित्राने आंधळेपणाने विश्वास ठेवला आणि तिच्या मनात स्वतःच्या आईबद्दल सूडाची भावना निर्माण झाली.

उशीने तोंड दाबून घेतला जीव

सुचित्राने आपल्या आईच्या घरी जाऊन ती झोपेत असताना उशीने तिचे तोंड दाबून तिचा जीव घेतला. गुन्हा लपवण्यासाठी तिने हा नैसर्गिक मृत्यू असल्याचे भासवण्याचा प्रयत्न केला आणि घाईघाईने अंत्यसंस्काराची तयारीही सुरू केली. मात्र, पुष्पावती यांचा मृतदेह पाहून गावातील लोकांना संशय आला. ग्रामस्थांनी तातडीने पोलिसांना पाचारण केले. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून सुचित्राची कसून चौकशी केली असता तिने आपला गुन्हा कबूल केला.

हे ही वाचा : आधी जावयासोबत अन् आता मेहुण्यासोबत पळाली; अनिताच्या प्रेमप्रकरणांची देशभर चर्चा

ज्योतिषाचा शोध सुरु

याप्रकरणी क्यातसांद्रा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून सुचित्राला अटक करण्यात आली आहे. या कटात सुचित्राच्या पतीचा काही सहभाग होता का, याचा तपास आता पोलीस करत आहेत. तसेच, सुचित्राला भडकवणाऱ्या त्या ज्योतिषाचाही शोध घेतला जात आहे. अंधश्रद्धेपोटी एका सुशिक्षित महिलेने आपल्याच आईचा बळी घेतल्याने परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.