आई इकडे डान्समध्ये व्यस्त, तर तिकडे सावत्र बापाने दीड वर्षांच्या बाळासोबत...

एका दीड वर्षाच्या निष्पाप बालकाच्या मृत्यूमुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. सावत्र बापाने केलेल्या अत्याचारामुळे बालकाचा मृत्यू झाल्याचे तसापात निष्पन्न झाले आहे.

Crime News

Crime News

मुंबई तक

• 02:50 PM • 02 Jun 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

आई इकडे डान्समध्ये व्यस्त,

point

तर तिकडे सावत्र बापाने दीड वर्षांच्या बाळासोबत...

Crime News : केरळमधील तिरुवनंतपुरम जिल्ह्यातील नेदुमंगड येथे एका दीड वर्षाच्या निष्पाप बालकाचा झालेल्या वेदनादायक मृत्यूने संपूर्ण राज्य हादरले आहे. सुरुवातीला निव्वळ अपघात वाटणारा हा प्रकार प्रत्यक्षात एक क्रूर हत्याकांड असल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. अर्शीद असे या दुर्दैवी बालकाचे नाव असून, सावत्र वडिलांनी केलेल्या मारहाणीमुळे त्याचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या घटनेने मानवतेला काळिमा फासला असून बालकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

हे वाचलं का?

...तेव्हा आई डान्समध्ये बिझी

घटनेच्या दिवशी चिमुरडा अर्शीद त्याचा सावत्र बाप अश्कर याच्यासोबत घरी होता. अश्कर याने पोलिस आणि रुग्णालयाची दिशाभूल करण्यासाठी एक खोटी कहाणी रचली होती. त्याने सांगितले की, तो मुलाला भात भरवत असताना मुलाने उलट्या केल्या आणि अन्न त्याच्या गळ्यात अडकले. अत्यंत गंभीर अवस्थेत तडफडणाऱ्या बालकाला तातडीने एसएटी (SAT) रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांचे सर्व प्रयत्न व्यर्थ ठरले आणि उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. संतापजनक बाब म्हणजे, जेव्हा हा निष्पाप जीव मृत्यूशी झुंज देत होता, तेव्हा त्याची सख्खी आई अखिला त्याला घरात सोडून तामिळनाडूमध्ये एका 'डान्स प्रोग्राम'मध्ये सहभागी होण्यासाठी गेली होती.

हे ही वाचा : मुलीच्या डॉक्टरकीसाठी जमीन विकली, पण शेतकरी बाप तिची बॉडी घेऊन परतला

निर्दयी दांपत्याची क्रूरता

यानंतर समोर आलेल्या रिपोर्टने काळजाचा थरकाप उडवणाऱ्या हत्याकांड उघडकीस आले. वैद्यकीय अहवालानुसार, बालकाच्या नाजूक शरीरावर मारहाणीचे अनेक जुने व गंभीर व्रण आढळून आले आहेत. यापूर्वीही या लहानग्याचे काही वेदनादायी फोटो समोर आले होते, ज्यामध्ये त्याच्या दोन्ही लहान हातांना प्लास्टर बांधलेले दिसत होते. त्यावेळी अश्कर आणि अखिला या निर्दयी दाम्पत्याने आपली क्रूरता लपवण्यासाठी, मुलगा खेळताना पडल्यामुळे त्याला दुखापत झाल्याचा खोटा दावा केला होता.

हे ही वाचा : संभाजीनगर : 25 वर्षीय तरुणाने 80 वर्षीय वृद्ध महिलेवर केला बलात्कार, पुढे..

आईलाही अटक होणार

या धक्कादायक प्रकारानंतर नातेवाईक आणि कुटुंबीयांनी संशय व्यक्त करत पोलिसांत तक्रार दाखल केली. नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार, सावत्र पिता अश्कर हा निष्पाप अर्शीदला वारंवार बेदम मारहाण करत असे आणि त्याला असह्य यातना देत असे. पोलिसांनी आता या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केला असून बालकाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी तिरुवनंतपुरम मेडिकल कॉलेज रुग्णालयात पाठवला आहे. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत असून, लवकरच या क्रूर सावत्र पित्याला आणि निष्काळजी माता अखिला हिला अधिकृतपणे अटक करण्यात येईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.