'अनैतिक संबंध ठेवतो काय...', 6 जणांनी मिळून तलवारीने कापलं तरुणाचं गुप्तांग

मध्यप्रदेशात एक धक्कादायक घटना घडल्याचं समोर आलं आहे. काही लोकांनी मिळून तलवारीने तरुणाचं गुप्तांग म्हणजेच प्रायव्हेट पार्ट कापल्याचा आरोप केला जात आहे. ज्या मुलासोबत असं घडलं त्या मुलावर अवैध संबंध असल्याचा संशय असल्याचं सांगितलं जात आहे.

तरुणावर हल्ला

तरुणावर हल्ला (प्रातिनिधिक फोटो, सौजन्य: GroK)

मुंबई तक

19 Apr 2025 (अपडेटेड: 19 Apr 2025, 09:51 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

मध्यप्रदेशातील अवैध संबंधाच्या संशयामुळे धक्कादायक प्रकार

point

तरुणावर अवैध संबंध असल्याचा संशय

point

तरुणाला घेरून त्याच्या गुप्तांगावर तलवारीने वार

आगर मालवा (मध्य प्रदेश): मध्य प्रदेशात एक धक्कादायक घटना घडल्याचं समोर आलं आहे. काही लोकांनी मिळून तलवारीने तरुणाचं गुप्तांग म्हणजेच प्रायव्हेट पार्ट कापल्याचा आरोप केला जात आहे. ज्या मुलासोबत असं घडलं त्या मुलावर अनैतिक संबंध असल्याचा संशय असल्याचं सांगितलं जात आहे. या घटनेनंतर तो तरुण गंभीर स्वरुपात जखमी झाला आहे. या घटनेनंतर मुलाला त्वरीत प्राथमिक उपचारांसाठी सूसनेर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते, त्यानंतर त्याला जिल्हा रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला गेला. आता, पोलिसांना या घटनेसंबंधी तक्रार दाखल केली आहे.

हे वाचलं का?

6 लोकांनी मिळून केला हल्ला

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना आगर मालवा जिल्ह्यातील बरोद पोलीस स्टेशन क्षेत्रातील नाना देहरिया गावात घडल्याचे समोर आले आहे. शुक्रवारी नाना देहरिया येथील एक तरुण सोलर प्लांटमध्ये मजूर म्हणून काम करण्यासाठी आपल्या गावाबाहेर पडला होता. या दरम्यान, त्याला वाटेत त्याच गावातील 6 जणांनी घेरले. यामधील 5 तरुण हे एकाच कुटुंबातील असून त्यात 1 गावातीलच तरुण होता.

हे ही वाचा: कामाची बातमी: मुलांचं आधारकार्ड अपडेट करताना लक्षात ठेवा 'हे' नियम, नाहीतर खूप होईल त्रास!

तलवारीने कापलं गुप्तांग

सुरुवातीला त्या तरुण आणि हल्लेखोरांमध्ये वाद झाला, पण या वादाचे रूपांतर हिंसाचारात झाले. दरम्यान, हल्लेखोरांपैकी एकाने तलवार काढून त्या तरुणावर हल्ला केला आणि त्याचे गुप्तांग कापले. यानंतर तो तरुण गंभीर स्वरुपात जखमी झाला.

जखमी मुलाची परिस्थिती

दरम्यान, पीडित तरुणाच्या कुटुंबाला हल्ल्याची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी पोहोचून तरुणाला तात्काळ सूसनेर सिव्हिल रुग्णालयात नेले. तरुणाची प्रकृती पाहून डॉक्टरांनी त्याला जिल्हा रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला. तरुणाची प्रकृती अजूनही गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.

हे ही वाचा: अमित शाहांच्या आवाजात PM मोदींचा Video, पण टीका ठाकरेंच्या कुटुंबावर

अनैतिक संबंध असल्याचा संशय- पोलिसांनी दिली माहिती

त्याच वेळी, सूसनेर पोलीस स्टेशनचे अधिकारी केसर राजपूत यांच्या मते, सुरुवातीच्या तपासात हे प्रकरण अनैतिक संबंधांच्या संशयाशी संबंधित असल्याचे दिसले. पोलिसांनी हल्लेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे आणि प्रकरणाचा तपास सुरू आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी वेगवेगळी पथकं तयार करण्यात आली आहेत.


 

    follow whatsapp