कामाची बातमी: मुलांचं आधारकार्ड अपडेट करताना लक्षात ठेवा 'हे' नियम, नाहीतर खूप होईल त्रास!

मुंबई तक

Child Aadhar Card Update: लहान मुलांचं आधार कार्ड वेळीच अपडेट न केल्यास भविष्यात समस्या उद्भवू शकतात. यासाठी मुलांचं आधार कार्ड वेळीच अपडेट करणं अनिवार्य असतं. मुलांच्या आधार कार्डमधील अपडेट कसं आणि कुठे करावं? याविषयी सविस्तर जाणून घ्या.

ADVERTISEMENT

आधारकार्डबाबत टिप्स
आधारकार्डबाबत टिप्स
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मुलांचं आधार कार्ड अपडेट कसं करावं?

point

मुलांचं आधार कार्ड अपडेट न केल्यास काय होतं?

point

लहान मुलांचं आधार कार्ड अपडेट करण्यासाठी आवश्यक नियम

Aadhaar Card Update: रवी आणि सीमा आपल्या 6 वर्षे वय असलेल्या मुलाचं म्हणजेच अर्जुनचं शाळेत प्रवेश घेण्यासाठी गेले होते. मात्र, त्यावेळी एक वेगळीच समस्या त्यांच्यासमोर आली. शाळेत अर्जुनचं आधार कार्ड मागितलं. अर्जुनच्या पालकांनी त्यावेळी आधारकार्ड दाखवल्यानंतर त्यामध्ये बायोमॅट्रिक अपडेट नसल्याचं त्यांना सांगण्यात आलं. दोघांना काय करावं, हेच कळेना. 

ही समस्या फक्त रवी आणि सीमाचीच नव्हे तर अशा अनेक पालकांची सुद्धा आहे, ज्यांना आपल्या मुलांच्या आधार कार्डमध्ये बायोमॅट्रीक अपडेट कधी आणि कसं करायचं?, याबाबतीत माहित नाही. लहान मुलांचं आधार कार्ड अपडेट करण्यासाठी कोणत्या बाबी आवश्यक असतात? याविषयी सविस्तर जाणून घेऊया. 

बायोमॅट्रीक अपडेट अनिवार्य आहे का?

5 वर्ष किंवा त्यापेक्षा कमी वय असलेल्या मुलांचं आधार कार्ड बनवताना फिंगरप्रिंट आणि आयरिस स्कॅन केलं जात नाही. फक्त फोटो आणि जन्म दाखल्याच्या साहाय्याने आधार कार्ड बनवलं जातं. मात्र, मुलांचं 5 वर्ष आणि 15 वर्ष वय पूर्ण झाल्यानंतर बायोमॅट्रीक अपडेट करणं अनिवार्य असतं. या प्रक्रियेला  Mandatory Biometric Update (MBU) असं म्हणतात. बायोमॅट्रीक अपडेट करण्याची ही प्रक्रिया विनामूल्य आहे. यासाठी कोणतेच शुल्क आकारले जात नाही. ही प्रक्रिया करण्यासाठी पालकांना मुलांना घेऊन आधार सेंटरला जावं लागतं.

हे ही वाचा: 2000 रुपयांपेक्षा UPI पेमेंटवर GST लागणार? खरं की अफवा.. मोदी सरकारने दिलं नेमकं उत्तर

हे वाचलं का?

    follow whatsapp