2000 रुपयांपेक्षा UPI पेमेंटवर GST लागणार? खरं की अफवा.. मोदी सरकारने दिलं नेमकं उत्तर

मुंबई तक

PIB Fact Check on UPI GST: युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) द्वारे पेमेंट करणाऱ्या यूजर्ससाठी एक महत्त्वाची बातमी आली आहे. 2000 रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या UPI व्यवहारांवर कोणताही कर लागणार नाही

ADVERTISEMENT

2000 रुपयांपेक्षा  UPI पेमेंटवर GST लागणार?
2000 रुपयांपेक्षा UPI पेमेंटवर GST लागणार?
social share
google news

PIB Fact Check on UPI GST: युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) द्वारे पेमेंट करणाऱ्या यूजर्ससाठी एक महत्त्वाची बातमी आली आहे. 2000 रुपयांपेक्षा जास्त किंमतीच्या UPI व्यवहारांवर कोणताही कर लागणार नाही. अलिकडेच काही अहवालांमध्ये असा दावा करण्यात आला होता की अशा व्यवहारांवर जीएसटी (GST) आकारला जाईल. पण आता सरकारने हे दावे पूर्णपणे खोटे आणि बनावट असल्याचे म्हटले आहे.

PIB ने दिली माहिती

2000 रुपयांपेक्षा जास्त किंमतीच्या व्यवहारांवर कोणताही जीएसटी लागू होणार नाही, असे अर्थ मंत्रालयाने म्हटले आहे. जानेवारी 2020 पासून पर्सन-टू-मर्चेंट (P2M) UPI व्यवहारांवरील व्यापारी सवलत दर (MDR) शून्य करण्यात आला आहे. अशा परिस्थितीत, या व्यवहारांवर GST लागू करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.

हे ही वाचा>> कामाची बातमी: फक्त 'या' 5 टिप्स फॉलो करा आणि काही मिनिटांतच चेक करा तुमचं PF बॅलेन्स

सरकारने इन्सेंटिव्ह योजना वाढवली

डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी, केंद्र सरकारने 2021 पासून एक इन्सेंटिव्ह योजना देखील सुरू केली आहे, जी 19 मार्च रोजी आणखी एका वर्षासाठी वाढवण्यात आली आहे. आता ही योजना 31 मार्च 2026 पर्यंत सुरू राहील. या योजनेवर सरकार सुमारे 1500 कोटी रुपये खर्च करेल.

या योजनेअंतर्गत गेल्या काही वर्षांत पुढीलप्रमाणे वाटप करण्यात आले आहे:

हे वाचलं का?

    follow whatsapp