अमित शाहांच्या आवाजात PM मोदींचा Video, पण टीका ठाकरेंच्या कुटुंबावर
भाजपने PM मोदींच्या राजकीय आयुष्यावर एक विशेष व्हिडिओ तयार केला आहे. ज्यासाठी स्वत: अमित शाह यांनी आवाज दिला आहे. ज्यामध्ये गांधी आणि ठाकरेंच्या घराणेशाहीवर टीका करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT

मुंबई: भारतीय जनता पक्षाच्या (BJP) महाराष्ट्र शाखेने आपल्या अधिकृत एक्स अकाउंटवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्या जीवनावर आधारित एक खास व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत पंतप्रधान मोदी यांचे राष्ट्रसेवा आणि भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी समर्पित जीवन दर्शविण्यात आले आहे. विशेष म्हणजे, या व्हिडिओसाठी केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे दिग्गज नेते अमित शाह यांचा आवाज (Voice Over) वापरण्यात आला आहे. पण या व्हिडिओत देखील भाजपने गांधी आणि ठाकरे कुटुंबावर निशाणा साधला आहे.
भाजप महाराष्ट्रने शेअर केलेल्या या व्हिडिओचा मुख्य उद्देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनातील संघर्ष, त्यांचे राष्ट्रसेवेचे योगदान हे अधोरेखित करणे हा आहे. व्हिडिओत मोदी यांच्या बालपणापासून ते गुजरातचे मुख्यमंत्री आणि नंतर भारताचे पंतप्रधान बनण्यापर्यंतच्या प्रवासाला चित्रात्मक स्वरूपात मांडण्यात आला आहे. पण त्यातच गांधी आणि ठाकरे कुटुंबावर टीका करण्यात आली आहे.
Video मध्ये गांधी आणि ठाकरें कुटुंबावर काय टीका?
'मी मोदीजींना खूप जवळून पाहिलं आहे. अनेक वर्षांपासून मी त्यांच्यासोबत काम केलं आहे. लालूजींनी एक गोष्ट बरोबर म्हटली.. (लालू प्रसाद म्हणतात की, तुमच्याकडे कुटुंब नाही) की, मोदींचा कोणताही परिवार नाही. कुटुंब ज्यांच्याकडे असतं ते मुलं, मुलींना पंतप्रधान बनविण्याचा प्रयत्न करतात, मुख्यमंत्री बनविण्याचा प्रयत्न करतात. सत्तेवर बसविण्याचा विचार करतात.'
हे ही वाचा>> नाशिकमध्ये 'मशाल' पेटली! "शिंदे फितूर आणि गद्दार, तर भाजप...", AI बाळासाहेबांचं भाषण वाचा जसच्या तसंं
'या व्यक्तीने 40 वर्षांपासून फक्त आणि फक्त देशातील जनतेसाठी काम केलं आहे. 23 वर्ष मुख्यमंत्री आणि पंतप्रधान असूनही मी त्यांना एक दिवसही सुट्टी घेतलेलं पाहिलं नाही. सकाळी 5 ते रात्री 1 वाजेपर्यंत सलग काम-काम, एका दिशेने काम आणि निस्वार्थी काम करताना पाहिलं आहे.' असं या व्हिडिओमध्ये म्हटलं आहे. ज्यामध्ये गांधी आणि ठाकरेंच्या घराणेशाहीवर टीका करण्यात आली आहे.