पोलीस सांगून गाडीत बसवत अपहरण, चाकू लावून 50 लाखांची बॅग घेतली आणि फेकून दिलं... हादरवून टाकणारी घटना

मुंबई तक

24 Jun 2025 (अपडेटेड: 24 Jun 2025, 08:54 AM)

अपहरणादरम्यान, आरोपींनी पीडिताला चाकू दाखवून, आवाज केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर त्याला नवी मुंबईतील खारघरमध्ये नेलं. तिथे त्याच्याकडेची पैशांनी भरलेली पिशवी हिसकावली.

Mumbai Tak
Google CTA

बातम्या हायलाइट

point

मुंबईतील भयावह प्रकार, अपहरण करुन 50 लाख लुटले

point

पोलीस असल्याची बतावणी करुन आरोपींनी केला गेम

मुंबई: दक्षिण मुंबईतील भुलेश्वर परिसरात एका व्यक्तीचं अपहरण करून त्याच्याकडील 50 लाख रुपये लुटल्याच्या धक्कादाय प्रकार घडला. 24 जून 2025 रोजी लोकमान्य टिळक मार्ग पोलिस स्टेशनमध्ये या लूट आणि अपहरणाची तक्रार नोंदवण्यात आली आहे. त्यानंतर पोलिसांनी वेगाने सुत्र फिरवली आणि तक्रारीच्या अवघ्या सहा तासांत पुणे, सतारा आणि ठाणे येथून आरोपींना ताब्यात घेतलं.या प्रकरणात पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. 

हे वाचलं का?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना भुलेश्वर येथे घडली. पीडित व्यक्ती 50 लाख रुपयांनी भरलेली पिशवी घेऊन जात होती. यावेळी चार अज्ञात व्यक्तींनी स्वतःला पोलीस अधिकारी म्हणवून त्याला अडवलं आणि जबरदस्तीने एका कारमध्ये बसवलं. 

हे ही वाचा >> बॉयफ्रेंड नंतर त्याच्या ड्रायव्हरसोबत अनैतिक संबंध, पतीला सोडून इतर दोघांसोबत... 3 मुलांच्या आईचे 'ते' कृत्य!

अपहरणादरम्यान, आरोपींनी पीडिताला चाकू दाखवून, आवाज केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर त्याला नवी मुंबईतील खारघरमध्ये नेलं. तिथे त्याच्याकडेची पैशांनी भरलेली पिशवी हिसकावली. तसंच, त्याच्या मोबाइलमधील सिम कार्ड काढून त्याला गाडीतून बाहेर फेकले आणि पुन्हा शहरात दिसल्यास बनावट चकमकीत एन्काऊंटर करण्याची धमकी दिली.

सहा तासात कसे पकडले आरोपी? 

पीडित व्यक्तीने दक्षिण मुंबईत परत येऊन लोकमान्य टिळक मार्ग पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली. पोलिसांनी तांत्रिक गोष्टींची तपासणी करून वाहनाची माहिती आणि इतर महत्त्वाचे पुरावे गोळा केले. मुंबई पोलिसांनी पुणे ग्रामीण पोलिसांच्या सहकार्याने खेड़-शिवापूर नाक्यावर दोन आरोपींना पकडलं. पुणे-सतारा महामार्गावर साताऱ्यात आणखी दोघांना ताब्यात घेतलं. तर पाचव्या संशयिताला ठाण्यातून अटक केली.

हे ही वाचा >> 'सोनमचे तर मुलींशी संबंध...', राजा रघुवंशीच्या ज्योतिषाचार्यांनी खळबळच उडवली!​​​

दरम्यान, पोलिसांनी आरोपींकडून 39 लाख रुपयांची रोकड, गुन्ह्यात वापरलेली सेडान कार आणि एक चाकू जप्त केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.