चोराच्या उलट्या बोंबा! पोलीस असल्याची खोटी ओळख, लंपास केले 2.89 कोटी नंतर...

मुंबई तक

07 Jun 2025 (अपडेटेड: 07 Jun 2025, 11:33 AM)

Mumbai Crime : मुंबईतील सायबर गुन्हेगारांनी सरकारी अधिकारी असल्याचे भासवून एका महिलेकडून 2.89 कोटी रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणादरम्यान, मुंबई पोलिसांनी कारवाईत विलंब न करता 1. 29 कोटी रुपये वसूल करण्यास मदत केली आहे. संबंधित प्रकरणाची माहिती मुंबई पोलीस अधिकाऱ्याने दिली आहे. 

Mumbai Crime Cyber criminals in Mumbai duped a woman of Rs 2.89 crore by posing as government officials

Mumbai Crime Cyber criminals in Mumbai duped a woman of Rs 2.89 crore by posing as government officials

Google CTA

बातम्या हायलाइट

point

एका महिलेकडून 2.89 कोटी रुपयांची फसवणूक

point

पोलीस असल्याची खोटी ओळख सांगत केली फसवणूक

Mumbai Crime : मुंबईतील सायबर गुन्हेगारांनी सरकारी अधिकारी असल्याचे भासवून एका महिलेकडून 2.89 कोटी रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणादरम्यान, मुंबई पोलिसांनी कारवाईत विलंब न करता 1. 29 कोटी रुपये वसूल करण्यास मदत केली आहे. संबंधित प्रकरणाची माहिती मुंबई पोलीस अधिकाऱ्याने दिली आहे. 

हे वाचलं का?

हेही वाचा : गुरु आणि शुक्र 12 वर्षानंतर येणार एकत्र, 'या' राशीतील लोकांची आर्थिक चणचण होणार दूर

सोमवार ते बुधवार दरम्यान, सायबर गुन्हेगारांनी विलेपार्ले परिसरात राहणाऱ्या 73 वर्षीय महिलेची भारतीय दूरसंचार नियमाक प्राधिकरणाचे अधिकारी, पोलीस कर्मचारी आणि न्यायाधीश असल्याचे भासवून फसवणूक केल्याचे सांगण्यात येत आहे. 

नेमकं काय घडल?

पोलीस अधिकाऱ्यांनी पीटीआय या वृत्तमाध्यमाशी बोलताना सांगितलं की, एका व्हॉट्सअॅप कॉलद्वारे बनावट अधिकारी बनून एका महिलेच्या खात्यातून अनियमित आर्थिक व्यवहार करण्यात आल्याचे सांगितले. दुसऱ्या आरोपीने, पोलीस अधिकारी असल्याची खोटी ओळख सांगत तिला धमकी दिली, तिचे एका व्यवसायिकाशी काही आर्थिक संबंध आहेत. याची चौकशी सुरु असून तिला अटक केली जाणार असल्याचे सांगण्यात आले, असे पोलिसांनी सांगितले.

पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने पुन्हा महिलेला व्हिडिओ कॉल केला आणि सांगितलं की, न्यायालयाने तिला अटकेपासून दूर ठेवलं आहे. अटकेसाठी आरोपीने सोमवार ते बुधवार महिलेला 2.89 कोटी रुपये ट्रान्सफर करण्यास सांगितले. याच प्रकरणात पीडित महिलेला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आणून दिले. तिने पीडितांना मदत करण्याच्यादृष्टीने 1930 सायबर हेल्पलाइनला माहिती दिली.

हेही वाचा : देवाच्या दारात चोरी! दान मोजणाऱ्या कर्मचाऱ्यांनं लाखो चोरले, 500 च्या नोटांचे बंडल कसे लपवायचा?

पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं की, एनसीईआरटी पोर्टलवर गुन्हा दाखल झाल्यानंतर, सायबर हेल्पलाइन सेलने हस्तांतरित केलेल्या 2. 89 कोटी रुपयांपैकी 2. 29 वसुन करण्यास पोलिसांना यश आले आहे. संबंधित प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.