नागपूर: "दीड कोटी रुपये दे, नाहीतर तुझी मुलगी..." पोलीस अधिकाऱ्यालाच फोन करून दिली धमकी अन्...

नागपुरात एका पोलीस अधिकाऱ्याच्या मुलीचं अपहरण करण्याची धमकी देत आरोपीने दीड कोटी रुपयांची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

पोलीस अधिकाऱ्यालाच फोन करून धमकी अन्...

पोलीस अधिकाऱ्यालाच फोन करून धमकी अन्...

मुंबई तक

• 10:18 AM • 05 Dec 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

पोलीस अधिकाऱ्याच्या मुलीचं अपहरण करण्याची धमकी

point

धमकी देत केली दीड कोटी रुपयांची मागणी

point

नागपुरातील धक्कादायक प्रकरण

Nagpur Crime: नागपुरात एका पोलीस अधिकाऱ्याच्या मुलीचं अपहरण करण्याची धमकी देत आरोपीने दीड कोटी रुपयांची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पोलीस अधिकाऱ्यालाच धमकी देऊन त्याच्याकडे कोटी रुपयांची मागणी केल्याप्रकरणी आरोपी तरुणाला अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. 

हे वाचलं का?

पोलीस अधिकाऱ्याला फोन करून धमकी... 

हे प्रकरण नागपूर शहर पोलीस स्टेशन अंतर्गत असल्याचं वृत्त आहे. शहरातील पोलीस दलात कार्यरत असलेले नरेंद्र तायडे यांना एक फोन आला आणि फोन करणाऱ्या तरुणाने अचानक त्यांच्या मुलीचे अपहरण करण्याची धमकी दिली आणि त्यांच्याकडून दीड कोटी रुपयांची खंडणी मागितली. पोलीस अधिकारी नरेंद्र तायडे यांनी तातडीने आपल्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना या प्रकरणाची माहिती दिली. 

हे ही वाचा: पाकिस्तानमध्ये HIV संक्रमण महामारीप्रमाणे पसरलं, रुग्णांमध्ये 200 टक्क्यांनी वाढलं, WHO महत्त्वाचा इशारा

यापूर्वी सुद्धा आरोपीवर गुन्हे दाखल 

प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन सदर पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला पोलिसांनी अटक केल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित आरोपीवर यापूर्वी सुद्धा शहरातील वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये गंभीर गुन्हे दाखल आहेत. 

हे ही वाचा: विश्वविजेता टीम इंडियाची खेळाडू ऋचा घोष बनली DSP; किती मिळणार पगार?

बदला घेण्यासाठी आरोपीचं कृत्य 

या प्रकरणातील आरोपीवर काही वर्षांपूर्वी पोलीस अधिकाऱ्यांकडून कारवाई करण्यात आली होती आणि याचा बदला घेण्यासाठी आरोपी तरुणाने पोलिसांना फोन केला आणि अचानक त्यांच्या मुलीच्या अपहरणाची धमकी देऊन त्यांच्याकडून दीड कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. या घटनेतील आरोपीविरुद्ध शहरातील सदर पोलीस स्टेशनमध्ये अपहरण, धमकी आणि खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हे दाखल केल्याचं वृत्त आहे. 

    follow whatsapp