तरूणाने वृद्धाला दगडाने ठेचून संपवलं, रंगेहाथ पकडल्यावर आरोपीच्या डोक्यात दगड...

मुंबई तक

09 Jun 2025 (अपडेटेड: 09 Jun 2025, 09:22 AM)

या घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी तात्काळ हस्तक्षेप केला आणि आरोपी अभिषेकला पकडलं. संतप्त जमावानं त्याला बेदम मारहाण केली.

Mumbai Tak
Google CTA

बातम्या हायलाइट

point

नवी मुंबईतील बेलापूरमध्ये घडली घटना

point

शहाबाद गावात रविवारी पहाटे वृद्धाची हत्या

point

हत्या करणाऱ्या युवकाला पकडलं तेव्हा काय घडलं

Navi Mumbai Crime News : नवी मुंबईत काल काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली. बेलापूर येथील शाहाबाद गावात रविवारी पहाटे एका वृद्ध व्यक्तीची हत्या करण्यात आली. दगडाने ठेचून या व्यक्तिची अत्यंत निर्घृणपणे हत्या  करण्यात आली. नेहमीप्रमाणे पूलाखाली झोपलेला असतानाच या वृद्धाची हत्या झाली. स्थानिकांनी आरोपीला रंगेहाथ पकडलं आणि त्याला मारहाण करून पोलिसांच्या ताब्यात दिलं.

हे वाचलं का?

हे ही वाचा >> जंगलात हनिमूनसाठी गेले, पण नवविवाहित जोडप्यासोबत घडलं सर्वात भयंकर! पोलिसांनाही बसलाय हादरा..

नेमकी घटना काय?

प्रकाश लोखंडे हे शाहाबाद गावातील रहिवासी होते. शनिवारी रात्री नेहमीप्रमाणे ते पूलाखाली झोपले होते. पहाटे अभिषेक नावाच्या तरुणाने नशेच्या अवस्थेत प्रकाश यांच्या डोक्यावर मोठा दगड टाकून त्यांची हत्या केली. ही हत्या अत्यंत क्रूरपणे करण्यात आली, असं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं.

आरोपीच्याही डोक्यात दगड घालण्याचा प्रयत्न...

या घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी तात्काळ हस्तक्षेप केला आणि आरोपी अभिषेकला पकडलं. संतप्त जमावानं त्याला बेदम मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एका व्यक्तीने आरोपीच्या डोक्यावर दगड मारण्याचा प्रयत्न केला, परंतु इतरांनी वेळीच त्याला थांबवलं आणि पोलिसांना बोलावलं. बेलापूर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून आरोपीला ताब्यात घेतलं असून, पुढील तपास सुरू आहे.

हे ही वाचा >> आधी पत्नीला गोळी घातली, नंतर स्वत:ला गोळी झाडून संपवलं; मुलगा, सुनेला वेगळं राहण्यावरुन...

दरम्यान, या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली. स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून, आरोपीच्या नशेच्या अवस्थेची आणि हत्येच्या कारणांची चौकशी करत आहेत.