Pune Crime : 'पांढऱ्या पायाची, जा तुझ्याबापाकडून कार...' वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर हुंडाबळीचं आणखी एक प्रकरण समोर

Pune Crime : वैष्णवी हगवणे प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. अशातच पुण्यात हुंडाबळीच्या अनेक घटना समोर येऊ लागल्या आहेत.

Pune Crime get a car from your father' Vaishnavi Hagavane case repeated in Pune

Pune Crime get a car from your father' Vaishnavi Hagavane case repeated in Pune

मुंबई तक

25 May 2025 (अपडेटेड: 25 May 2025, 06:26 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

वैष्णवी हगवणे प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत.

point

अशातच पुण्यात हुंडाबळीच्या अनेक घटना समोर येऊ लागल्या आहेत.

point

महिलाही आपल्या मनातील सल बोलून दाखवत आहेत.

Pune Crime : वैष्णवी हगवणे प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. दरम्यान, वैष्णवीप्रमाणेच इतर अनेक महिलांना सासरच्यांचा जाच सहन करावा लागत आहे. वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर राज्यातील महिलांनी आपल्या मनातील सल व्यक्त केली आहे. अशातच पुण्यात हुंडाबळीचे आणखी एक प्रकरण समोर आलं आहे. ज्यात एक पती आपल्याच पत्नीकडे गाडीची मागणी करत आहे. तुझ्या बापाला गाडी द्यायला सांग, असं म्हणत तिला छळत आहे. तर दुसरीकडे सासू सूनेला तू तर पांढऱ्या पायाची आहेस, असे म्हणत तिचं मानसिक खच्चिकरण केलं जात आहे.  या छळाला कंटाळून महिलेनं विषप्राशन केलं आहे. दरम्यान, ही घटना पुण्यातील लोहगाव येथे घडली आहे. 

हे वाचलं का?

हेही वाचा : Mansoon update : 12 दिवसांआधीच राज्यात मान्सून दाखल, मुंबई-पुण्यात काही तासांतच धडकणार

नेमकं काय घडल? 

पीडित मृत महिलेची सासू आणि पती हे नेहमी महिलेकडे हुंड्याची मागणी करत होते. तु तर पांढऱ्या पायाची आहेस, असं म्हणत तिच्या सासूने तिला अनेकदा छळलं आहे. यामुळे पीडित सुनेनं औषध पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. या प्रकरणात आता 23 वर्षीय महिलेने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. यावरून आता विमानतळ पोलीस ठाण्यात पीडित मृत महिलेचा पती अजय पवार, सासू कमल पवार आणि दीर मनोज पवार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सुनेनं केली फिर्याद दाखल

फिर्यादीत दिलेल्या तक्रारीनुसार, पीडित सुनेचा आणि अजयचा 22 मे 2022 रोजी विवाह झाला होता. विवाहाच्या काही महिन्यानंतर अजय पवार आणि पत्नीमध्ये कौटुंबिक कलह झाला. या कलहात पतीने पत्नीला शिवीगाळ करत मारहाण केली. यानंतर अजयची आई म्हणजेच सासू कमल पवारने सुनेला माहेरवरून काय आणलं आहेस? असा प्रश्न केला. त्यानंतर त्यांनी तुझ्या आई बापाला काही मिळत नाही, तुमची लायकी नाही, असं म्हणत पीडित सुनेला अनेकदा त्रास मानसिक छळ केला. 

पुढे लिहिण्यात आले की, पती अजय पवारने आपल्या पत्नीला मी तुझ्याशी टाईमपास केला, तू मेली तरी चालेल. मला फक्त पैशांची गरज आहे. तुझ्या बापाला मला कार घेऊन द्यायला सांग. अशावेळी पत्नीने याबाबत नकार दिला असता, पतीने पत्नीला मारहाण केली. पीडितेच्या दीरानेही पीडितेला अनेकदा शिवीगाळ केली. त्यानंतर सासूने तु पांढऱ्या पायाची आहेस, तुझी नजरच चांगली नाही, जेव्हापासून तु घरात आली तेव्हापासून घरात शांतता टिकत नाही, असे म्हणत तिला हिणवलं गेलं. 

हेही वाचा : लेकानं आईशी ठेवले अनैतिक संबंध, लेकीनं पाहताच बापानं...

या एकूण छळाने पीडित सुनेनं झुरळ मारायचं औषध प्यायलं आणि आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, सध्या पीडितेची प्रकृती स्थिर आहे. अशातच राज्यभरात वैष्णवी हगवणे प्रकरणाची चर्चा आहे. या प्रकरणामुळे राज्यातील छळाला कंटाळलेल्या महिला आपल्या मनातील सल व्यक्त करू लागल्या आहेत. 

    follow whatsapp