Pune Crime : अल्बममध्ये काम देतो असं सांगितलं, घाटात शूटींगही झालं, नंतर फ्लॅटवर नेत तोडले लचके अन्...

Pune Crime : गाण्यात काम देतो असे सांगत तरुणाने शूटींगला बोलावलं. त्यानंतर एका फ्लॅटमध्ये तरुणीवर बलात्कार करण्यात आला. पुणे आणि कराड या ठिकाणी हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Pune Crime

Pune Crime

मुंबई तक

20 Aug 2025 (अपडेटेड: 20 Aug 2025, 12:52 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

28 वर्षीय तरुणीला गाण्यात काम मिळवून देण्याचे दाखवले आमिष

point

आयटी कंपनीत काम करणाऱ्या तरुणीचे फ्लॅटवर लैंगिक शोषण

point

नेमकं काय घडलं?

Pune Crime : आयटी कंपनीत काम करणाऱ्या एका 28 वर्षीय तरुणीला गाण्यात काम मिळवून देण्याचे आमिष दाखवले. त्यानंतर त्या तरुणीवर अमानुषपणे बलात्कार करण्यात आला. ही घटना कराड येथील असून या प्रकरणी आरोपी विशाल दीपक या तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चंदननगर पोलिसांनी हा गुन्हा झिरो एफआरआयने कराड पोलिसांकडे पाठवला आहे. संबंधित प्रकरणात पोलीस पुढील तपास करत असल्याचं सांगण्यात येत आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : ‘दोन शून्यां’ची बेरीज केली आणि त्यावर कितीही शून्ये जोडली तरी..' भाजप नेत्यानं ठाकरेंना डिवचलं

अल्बम साँगसाठी  शूटींग असल्याचं सांगून....

पीडित तरुणी मूळची ही परराज्यातील असून सध्या ती पुण्यातील एका आयटी कंपनीत नोकरीस आहे. तिला अभिनयाची आवड आहे. ती नेहमी अभिनयासाठी काहीना काही शोधत असायची. तिने एक ओम तेजा प्रोडक्सन नावाचा व्हॅट्स अॅप ग्रुप जॉइन केला होता. या गुप्रमध्ये विशालने शॉर्म फिल्मच्या एका पात्रासाठी तरुणी हवी असल्याची पोस्ट शेअर केली होती. त्यानंतर विशालने संबंधित तरुणीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला आणि अल्बम साँगसाठी  शूटींग असल्याचं सांगून तरुणीला कराडला बोलावले. 

तरुणी ही ठरल्याप्रमाणे जूनमध्ये कराडात गेली असता, विशालने बस स्थानकातून तिला स्वत:च्या घरी नेले. त्यानंतर दोन दिवस सलग विविध घाट परिसरात शूटिंग झाले. त्यानंतर, तिसऱ्या दिवस विशालने तिला एका फ्लॅटवर नेले आणि तिच्यावर अमानुष बलात्कार केल्याचं तक्रारीत नमूद केलं आहे.

हे ही वाचा : निसर्गापुढे देवाचीही शरणांगती, गणेशोत्सवाच्या तोंडावर गणेश मूर्ती पाण्याखाली, मूर्तीकारांच्या अश्रूंचा बांधा फुटला

चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल  

एकूण घटनेनंतर तरुणीला पुण्यात पाठवण्यात आले असता, नंतर विशालने फोनद्वारे संपर्क साधत, लिव्ह इनमध्ये राहण्याची मागणी केली.पीडितेनं सरळ नकार दिल्यानंतर विशालने तरुणीचा पाठलाग सोडला नाही. हा धक्कादायक प्रकार सात जून ते 17 ऑगस्टपर्यंत सुरुच होता. त्यानंतर पीडितेनं चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. 

    follow whatsapp