माझ्यावर बलात्कार झालाय, आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरच्या हातावर मजकूर आढळला; सातारा हादरला!

Satara Crime : माझ्यावर बलात्कार झालाय, आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरच्या हातावर मजकूर आढळला; सातारा हादरला!

Mumbai Tak

मुंबई तक

24 Oct 2025 (अपडेटेड: 24 Oct 2025, 10:53 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

माझ्यावर बलात्कार झालाय, महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणाला वेगळं वळण

point

आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरच्या हातावर मजकूर आढळला

Satara Crime : फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरने आत्महत्येने संपूर्ण सातारा जिल्हा हादरला असताना, या प्रकरणाला आता नवं आणि धक्कादायक वळण मिळाले आहे. आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरच्या हातावर “माझ्यावर बलात्कार झाला” असा मजकूर लिहिलेला आढळल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे पोलिसांसमोर आता या प्रकरणाचा तातडीने तपास करण्याचे आव्हान असणार आहे. 

हे वाचलं का?

मिळालेल्या माहितीनुसार, काही महिन्यांपासून आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टर या पोलीस आणि आरोग्य विभागातील वादात अडकल्या होत्या. वैद्यकीय तपासणीदरम्यान एका पोलिस अधिकाऱ्यांसोबत त्यांचा वाद झाला होता, त्यानंतर त्यांच्या विरोधात अंतर्गत चौकशीही सुरू करण्यात आली होती. या सर्व घडामोडींमुळे त्या मानसिक तणावाखाली होत्या, अशी माहिती समोर आली आहे.

हेही वाचा : पुणे हादरलं, चारित्र्यावर संशय घेणाऱ्या पतीला पत्नीने गळा आवळून संपवलं, मुलं घरात असतानाच घडला प्रकार

“माझ्यावर अन्याय होत आहे, मी आत्महत्या करीन”

महिला डॉक्टरने काही दिवसांपूर्वी आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार देत म्हटले होते की, “माझ्यावर अन्याय होत आहे, मी आत्महत्या करीन.” मात्र, त्यांच्या या तक्रारीकडे संबंधित अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याची चर्चा वैद्यकीय वर्तुळात सुरु आहे. गुरुवारी रात्री फलटण शहरातील एका हॉटेलमध्ये त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच फलटण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. हॉटेलच्या खोलीत डॉ. मुंडे यांचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. प्राथमिक तपासानंतर पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी फलटण उपजिल्हा रुग्णालयात पाठवला आहे.

आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरच्या हातावर मजकूर आढळला 

आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टर या कर्तव्यनिष्ठ आणि रुग्णप्रिय डॉक्टर म्हणून ओळखल्या जात होत्या. त्यांच्या मृत्यूने वैद्यकीय क्षेत्रात आणि आरोग्य विभागात शोककळा पसरली आहे. मात्र, आता त्यांच्या हातावर “माझ्यावर बलात्कार झाला” असा मजकूर सापडल्याने आत्महत्येच्या मागील कारणांबाबत नवीन प्रश्न निर्माण झाले आहेत. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास आता केवळ आत्महत्या म्हणून नव्हे तर संभाव्य अत्याचार आणि दबावाच्या अँगलने सुरू केला आहे. तपासासाठी विशेष पथक नियुक्त करण्यात आले असून, मृत्यूमागील खरी कारणमीमांसा उघड करण्यासाठी सर्व पुरावे आणि दस्तऐवज तपासले जात आहेत.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरची आत्महत्या, काही दिवसांपूर्वीच केलेली वरिष्ठांकडे तक्रार; नेमकं काय घडलं?


 

    follow whatsapp