पत्नीच्या चारित्र्यावर संशय अन् हत्या, मृतदेह पलंगाखाली, सातारा हादरला..

मुंबई तक

22 Jun 2025 (अपडेटेड: 22 Jun 2025, 08:48 PM)

Satara Crime News : साताऱ्यातील मंगळवार पेठेतील रवी रिजन्सी या परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. अंजली राजेंद्र शिंदे या महिलेच्या चारित्र्यावर पतीने संशय घेतला आणि तिची हत्या केली. या प्रकरणात महिलेच्या भावाने शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

satara crime news

satara crime news

Google CTA

बातम्या हायलाइट

point

पतीनेच पत्नीच्या चारित्र्यावर व्यक्त केला संशय

point

मृतदेह पलंगाखाली

Satara Crime News : साताऱ्यातील मंगळवार पेठेतील रवी रिजन्सी या परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. अंजली राजेंद्र शिंदे या महिलेच्या चारित्र्यावर पतीने संशय घेतला आणि तिची हत्या केली. या प्रकरणात महिलेच्या भावाने शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणातील महिला अंजली राजेंद्र शिंदेचं (वय 29), तर आरोपी पती राजेंद्र भानुदास शिंदे (वय 32) याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.  

हे वाचलं का?

हेही वाचा : Astrology : गजकेसरी योगामुळे तुमच्या आयुष्याला मिळणार नवी दिशा, 'या' राशींच्या लोकांना टेन्शन नॉट

चारित्र्यावर संशय अन् खून 

पतीने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत खून केल्याचा आरोप आहे. यावरुन मृत झालेल्या महिलेच्या भावासोबत आरोपीची झटापट झाली. अशावेळी आरोपी जखमी झाल्याने त्याला उपचारासाठी सातारा जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. संबंधित घटनेची माहिती मिळताच, पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन तपास केला आणि माहिती मिळवली. दरम्यान, संबंधित प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.  

राजेंद्र शिंदे हा सेंट्रींगचं काम करतो. त्याला दारूचे व्यसन आहे. तो नेहमी आपल्या बायकोच्या चारित्र्यावर संशय घेत होता. याच कारणावरून दोघांमध्ये नेहमी वाद व्हायचे. दरम्यान, 19 जून रोजी दोघांमध्ये जोराचं भांडण झालं होतं. त्यानंतर अंजली शिंदे यांनी भांडणाबाबत आपल्या माहेरच्यांना कळवलं होतं. 

दुसऱ्या दिवशी म्हणजेच 20 जून रोजी सकाळच्या सुमारास अंजलीचा मृतदेह पलंगाखालील एका कापड्यात गुंडाळून ठेवण्यात आला होता. अंजलीच्या मृत्यूची माहिती मिळताच, मयत महिलेचा भाऊ श्रेयश पाटील हा तिथे आला आणि आरोपी राजेंद्र यांच्यात धरपकड झाली. यामध्ये आरोपी जबर जखमी झाला, त्याच्यावर सातारा जिल्ह्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

हेही वाचा : पोहायला जातो सांगून गेले अन् परतलेच नाही... 17 तासानंतर सापडले दोन्ही भावांचे मृतदेह

या घटनेनं साताऱ्यात एकच खळबळ उडली आहे. याप्रकरणात मृत्यूचे कारण आता समोर आलेलं नाही. मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे, अशी माहिती आता पोलिसांनी दिली आहे.