तीन वर्षांच्या मुलाला जीवंत जाळले, कॉन्स्टेबल बायकोच्या डोक्यात हातोडा घालून संपवले; धक्कादायक प्रकरण

एका नराधमाने विम्याचे पैसे मिळवण्यासाठी पत्नी आणि मुलाला कारमध्ये लॉक करुन जीवंत जाळले. याआधी हा रस्त्यावर झालेला अपघात आहे असे पोलिसांना वाटले, मात्र यानंतर तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Crime News

Crime News

मुंबई तक

• 04:56 PM • 07 Apr 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

तीन वर्षांच्या मुलाला जीवंत जाळले

point

कॉन्स्टेबल बायकोच्या डोक्यात हातोडा घालून संपवले

point

धक्कादायक प्रकरण

Crime News : उत्तर प्रदेशातील रामपूरमध्ये 25 फेब्रुवारी रोजी नैनीताल महामार्गावर झालेल्या एका कार अपघाताचे गूढ उकलण्यात पोलिसांना यश आले आहे. या घटनेत महिला पोलीस कर्मचारी लता आणि त्यांचा तीन वर्षांचा मुलगा आवांश यांचा होरपळून मृत्यू झाला होता. मृत महिला पोलिस कर्मचाऱ्याचा पती दान सिंह याने सुरुवातीला हा अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेचा अपघात असल्याचे भासवले होते. मात्र, पोलीस तपासात हा अपघात नसून विमा क्लेम मिळवण्यासाठी थंड डोक्याने रचलेला रक्ताचा कट असल्याचे समोर आले आहे.

हे वाचलं का?

विम्यासाठी केली बायको अन् मुलाची हत्या

पोलीस अधीक्षक सुमेंद्र मीणा यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पती दान सिंह याने आपल्या दोन साथीदारांच्या मदतीने हा दुहेरी नरसंहार घडवून आणला. त्याने आधी पत्नी आणि मुलाला कारमध्ये बसवून त्यांना गुंगीची औषधे दिली. त्यानंतर कारवर पेट्रोल ओतून ती पेटवून दिली. या आगीत निष्पाप आवांश कारमधून बाहेर पडू शकला नाही आणि त्याचा होरपळून मृत्यू झाला. मात्र, गुंगीच्या अवस्थेत असतानाही लता कशाबशा कारबाहेर पडल्या, परंतु हैवान बनलेल्या पतीने त्यांना वाचवण्याऐवजी त्यांच्यावर पुन्हा जीवघेणा हल्ला केला.

हे ही वाचा : धक्कादायक... डोसा खाल्ला अन् दोन छोट्या मुलींचा गेला जीव, आई-वडिलांची प्रकृती अत्यंत नाजूक

बायकोवर हातोड्याने वार

याहूनही भयानक बाब म्हणजे, जेव्हा गंभीर जखमी लता यांना रुग्णालयात नेले जात होते, तेव्हा त्या जिवंत असल्याचे दान सिंहच्या लक्षात आले. पकडले जाण्याच्या भीतीने त्याने गाडीत असलेल्या हातोड्याने पत्नीच्या डोक्यावर जोरदार प्रहार केला. या गंभीर दुखापतीमुळे उपचारादरम्यान लता यांचा मृत्यू झाला. तपासादरम्यान पोलिसांना असेही आढळले की, आरोपीचे दुसऱ्या एका महिलेसोबत प्रेमसंबंध सुरू होते, जे या क्रूर कृत्यामागचे दुसरे मोठे कारण असू शकते.

हे ही वाचा : साखरपुड्याआधी तरुणी बॉयफ्रेंडसोबत झाली फिजिकल, प्रकरण थेट पोलीस ठाण्यापर्यंत गेलं...

तिघांना अटक, दोघे फरार

या संपूर्ण कटाचा मुख्य उद्देश आर्थिक लाभ मिळवणे हा होता. दान सिंहला आपल्या पोलीस पत्नीचा मृत्यू 'रस्ते अपघात' दाखवून विमा कंपनीकडून मोठी रक्कम आणि सरकारी सवलती लाटायच्या होत्या. या गुन्ह्यात त्याला नूर हसन, सलमान, रवी आणि प्रदीप या साथीदारांनी मदत केली. पोलिसांनी मुख्य आरोपी दान सिंहसह सलमान आणि नूर हसन या तिघांना अटक केली असून, फरार आरोपी रवी आणि प्रदीप यांचा शोध सुरू आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.