बागेत आढळला गर्भवती तरुणीचा मृतदेह, दोन प्रियकरांवर गुन्हा; गर्भ नेमका कुणाचा?

मुंबई तक

• 11:48 AM • 15 Aug 2026

उद्यानात एका गर्भवती तरुणीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. मृतदेहाच्या तोंडातून फेस येत होता असे पोलिसांचे म्हणणे आहे. उत्तर प्रदेशातील याप्रकरणी तरुणीच्या दोन प्रियकरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Crime News

Crime News

Google CTA

बातम्या हायलाइट

point

बागेत आढळला गर्भवती तरुणीचा मृतदेह

point

दोन प्रियकरांवर गुन्हा

point

गर्भ नेमका कुणाचा?

Crime News : एका बागेत एका गर्भवती तरुणीचा मृतदेह आढळल्याप्रकरणी पोलिसांनी तिच्या दोन प्रियकरांवर गुन्हा दाखल केला आहे. रेणू सोनकर (वय 25) असे या मृत तरुणीचे नाव असून ती सहा महिन्यांची गर्भवती असल्याची पुष्टी शवविच्छेदनातून झाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी फतेहपूर येथील एका प्रियकराला ताब्यात घेतले असून दुसरा प्रियकर पतारा येथीलच आहे. हा दुसरा प्रियकर तरुणीपेक्षा सुमारे 25 वर्षांनी मोठा असून पोलीस सध्या त्याच्या शोधासाठी ठिकठिकाणी छापे टाकत आहेत. उत्तर प्रदेशातील पतारा येथील ही घटना आहे.

हे वाचलं का?

दोन प्रियकर आणि मृत्यू

पोलिसांच्या तपासानुसार आणि कॉल रेकॉर्ड्सवरून (CDR) समोर आले आहे की, रेणूचे 50 वर्षीय गोले पांडे आणि प्रांजुल पाल या दोघांशी बोलणे सुरू होते. बुधवारी रात्री तिचे या दोघांशीही फोनवर संभाषण झाले होते. पोलिसांनी प्रांजुलला ताब्यात घेतले असून त्याने चौकशीत अनेक खुलासे केले आहेत. दुसरीकडे, बुधवारी रात्री गोले पांडे रेणूला कानपूरच्या एलएलआर रुग्णालयात घेऊन गेला होता. तेथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केल्यावर त्याने तिला स्वतःची मुलगी असल्याचे सांगून पोलिसांची कारवाई टाळली आणि खाजगी रुग्णवाहिकेने मृतदेह आणून बागेत फेकून दिला.

हे ही वाचा : स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा; देशाच्या प्रगतीला गती देणार 'शक्तीची सप्तधारा'

तोंडातून फेस येत होता

गोले पांडे याच्या पत्नीचे निधन झाले असून त्याने रेणूच्या कुटुंबावर यापूर्वी भरपूर पैसा खर्च केला होता, ज्यात त्यांना प्लॉट आणि स्कूटी घेऊन देण्याचा समावेश असल्याचे समोर आले आहे. मात्र, रेणू गर्भवती राहिल्यानंतर कुटुंबाच्या नाराजीमुळे आणि गोलेनेही जबाबदारी झटकल्यामुळे ती अत्यंत त्रस्त होती. 11 जुलै रोजी घर सोडल्यानंतर ती दोन दिवस बस स्टँडवर आणि इतरत्र भटकत होती. गुरुवारी (13 ऑगस्ट) जेव्हा तिचा मृतदेह आढळला, तेव्हा तिच्या तोंडातून फेस येत होता, ज्यामुळे गोलेसमोरच तिने विषारी पदार्थ प्राशन केल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे.

हे ही वाचा : आश्रमशाळेत सापाचा सतत वावर, मुख्याध्यापक बोलू देईना, मुंबई Tak ला थेट रोखण्याचा प्रयत्न

रेणूच्या पोटातील गर्ङ कोणाचा?

सध्या गोले पांडे फरार असून त्याचा फोन बंद येत आहे; त्याचे शेवटचे लोकेशन नौबस्ता येथे आढळले होते. अटकेत असलेला प्रांजुलही या प्रकरणातील गुंतागुंत पूर्णपणे सोडवू शकलेला नाही. रेणूच्या पोटातील गर्भ नक्की कोणाचा आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. यासाठी अर्भकाचे डीएनए (DNA) नमुने घेण्यात आले असून, ते दोन्ही आरोपींच्या डीएनए नमुन्यांशी जुळवून पाहिले जातील, जेणेकरून या दुर्दैवी प्रकरणाचा पुढील उलगडा होऊ शकेल आणि सत्य समोर येईल.