Ajit Pawar NCP : ''असतील दाजी, तरच लावू जीवाची बाजी...!''

मुंबई तक

02 Apr 2024 (अपडेटेड: 02 Apr 2024, 02:48 PM)

Dharashiv Lok Sabha Election 2024, Suresh Birajdar : ओमप्रकाश निंबाळकर निंबाळकर धाराशीवमधून महाविकास आघाडीचे उमेदवार ठरले आहेत. पण निंबाळकरांविरूद्द अद्याप महायुतीचा उमेदवार ठरला नाही. महायुतीकडून अनेक नाव चर्चेत आहेत, त्यात विक्रम काळे यांचे नाव आघाडीवर आहे.

dharashiv lok sabha constituency 2024 suresh birajdar worker angry vikram kale ajit pawar ncp mahayuti

सुरेश बिराजदार समर्थक नाराज झाले आहेत.

follow google news

Dharashiv Lok Sabha Election 2024, Suresh Birajdar : धाराशीव लोकसभा मतदार संघातून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने ओमप्रकाश निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे निंबाळकर धाराशीवमधून महाविकास आघाडीचे उमेदवार ठरले आहेत. पण निंबाळकरांविरूद्द अद्याप महायुतीचा उमेदवार ठरला नाही. महायुतीकडून अनेक नाव चर्चेत आहेत, त्यात विक्रम काळे यांचे नाव आघाडीवर आहे. पण या नावामुळे सुरेश बिराजदार समर्थक नाराज झाले असून त्यांनी सोशल मीडियावर नाराजी व्यक्त करायला सुरूवात केली आहे.  (dharashiv lok sabha constituency 2024 suresh birajdar worker angry vikram kale ajit pawar ncp mahayuti)   
 
महायुतीच्या जागावाटपात धाराशीवची जागा ही अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सुटली आहे. या जागेवर महायुतीकडून आमदार सतीश चव्हाण, सुरेश बिराजदार, प्रवीणसिंह परदेशी, आमदार विक्रम काळे यांच्या नावाची चर्चा सूरू होती. अशात महायुतीकडून विक्रम काळे यांच्या नावाला पसंती मिळाल्याची माहिती आहे. त्यामुळे आता काळेंना उमेदवारी दिली जाणार असल्याने बिराजदार समर्थक नाराज झाले आहेत. या समर्थकांनी सोशल मीडियावर नाराजी व्यक्त करायला सुरुवात केली आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : "भाजपचा एकनाथ शिंदेंवर दबाव", शिवसेनेच्या नेत्याच्या विधानाने खळबळ

कार्यकर्त्यांची संतप्त पोस्ट... 

सुरेश बिराजदार यांना तिकीट नाकारण्यात आल्याने कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली आहे.  असतील दाजी, तरच लावू जीवाची बाजी...! 35 वर्षे पवार कुटुंबासोबत आणि पक्षस्थापणेपासून आतापर्यंतचे राजकीय आयुष्य पक्षासाठी देऊनही बिराजदार (दाजी) यांच्यासारख्या देवमाणसाला पक्षाकडून न्याय मिळत नसेल तर एक सामान्य कार्यकर्ता म्हणून माझे काय अस्तित्व असेल, अशा भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या आहेत. 

दरम्यान महायुतीतील सर्व गटांनी आमदार काळे यांच्या नावाला पसंती दिली आहे. मात्र अद्याप नाव निश्चित करण्यात आले नाही आहेत. धाराशीव मतदार संघातून कामाला लागा अशा सूचना अजित पवारांनी मला दिल्याचे देखील बिराजदार यांनी सांगितले आहे. आता धाराशीवमधून विक्रम काळे की सुरेश बिराजदार यांना उमेदवारी जाहीर होते. हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

    follow whatsapp