Opinion Poll: अजितदादांना मोठा झटका, बारामतीतून सुप्रिया सुळे आघाडीवर

मुंबई तक

17 Apr 2024 (अपडेटेड: 17 Apr 2024, 12:02 AM)

Baramati Supriya Sule Lead: एबीपी सी-व्होटरने एक ओपिनियन पोलनुसार बारामतीत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसू शकतो. कारण येथून सुप्रिया सुळे यांना आघाडी मिळत असल्याचा अंदाज सर्व्हेत वर्तवण्यात आला आहे.

अजितदादांना मोठा झटका, बारामतीतून सुप्रिया सुळे आघाडीवर

अजितदादांना मोठा झटका, बारामतीतून सुप्रिया सुळे आघाडीवर

follow google news

Lok Sabha Election 2024 Opinion Poll Baramati Supriya Sule Lead: बारामती: लोकसभा निवडणूक 2024 (Lok Sabha Election 2024) ही महाराष्ट्राच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे. कारण याच निवडणुकीत कोणत्या पक्षाची नेमकी किती ताकद महाराष्ट्रात आहे हे दिसून येणार आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात कधीही न घडलेलं राजकारण हे मागील पाच वर्षात घडलं. त्यातही शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन पक्ष फुटले. ज्यामुळे राजकारणच बदलून गेलं. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचा विशेषत: शरद पवारांचा कायमच बालेकिल्ला राहिलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघच ताब्यात मिळविण्यासाठी एनडीएने खास रणनिती आखली आहे. मात्र, नुकतंच जाहीर झालेल्या एक सर्व्हेनुसार, बारामतीत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा हादरा बसू शकतो. (lok sabha election 2024 abp c voter opinion poll big blow to ajit pawar ncp supriya sule leading from baramati)

हे वाचलं का?

एबीपी सी-व्होटरने एक ओपिनियन पोल नुकताच जाहीर केला. त्यामध्ये राज्यातील 48 मतदारसंघांचा आढावा घेण्यात आला आहे. ज्यानुसार महाराष्ट्रात NDA ला एकूण 30 जागा आणि INDIA आघाडीला 18 जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मात्र, यामध्ये बारामतीबाबत जो अंदाज वर्तविण्यात आला आहे त्याने अजित पवारांची चिंता नक्कीच वाढू शकते. 

बारामतीत सुप्रिया सुळे बाजी मारणार?

बारामती हा कायमच पवारांचा गड राहिला आहे. आतापर्यंत भाजपला येथे आपला उमेदवार एकदाही निवडून आणता आलेला नाही. मात्र, वर्षभरापूर्वीच अजित पवार हे भाजपसोबत सत्तेत सामील झाले आणि तिथूनच सुरू झालं ऑपरेशन बारामती.. 

मधल्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस हे नाव आणि पक्षाचं घड्याळ हे चिन्ह निवडणूक आयोगाने अजित पवार यांच्या गटाला देऊ केलं. त्यामुळे नवं चिन्ह आणि नवं नाव घेऊन शरद पवार यांना निवडणुकीला सामोरं जावं लागत आहे. मात्र, असं असताना देखील बारामतीत अजित पवार हे यशस्वी होत नसल्याचं सर्व्हेत म्हटलं आहे.

हे ही वाचा>> महाराष्ट्र: 48 मतदारसंघामध्ये कोण जिंकणार? संपूर्ण यादी

सलग तीन टर्म बारामतीच्या खासदार असलेल्या सुप्रिया सुळे यांना पराभूत करण्यासाठी एनडीएने इथे अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनाच रिंगणात उतरवून शरद पवारांसमोर मोठं आव्हान उभं केलं आहे. एकीकडे भाजपची ताकद आणि दुसरीकडे अजित पवार यांची बारामतीवर असलेली पकड या सगळ्यामुळे सुप्रिया सुळेंसाठी ही निवडणूक अत्यंत कठीण ठरली आहे.

पण असं असतानाही बारातमी लोकसभा मतदारसंघ हा पुन्हा एकदा सुप्रिया सुळेंच्या पाठीशी असल्याचं एबीपी सी-व्होटरच्या सर्व्हेतून दिसतं आहे.

सर्व्हेनुसार या मतदारसंघात सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यात काँटे की टक्कर होऊ शकते. पण त्यामध्ये सुप्रिया सुळे या आघाडी घेऊ शकतात. हीच आघाडी जर निर्णायक ठरली तर सुनेत्रा पवारांना त्याचा फटका बसू शकतो.

हे ही वाचा>> Opinion Poll: BJP ला 'एवढ्या' जागा, MVA चं वाढलं टेन्शन

बारामतीकडे अवघ्या देशाचं लक्ष

बारामती लोकसभा मतदारसंघासाठी तिसऱ्या टप्प्यात मतदान होणार आहे. 7 मे रोजी येथे मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. त्यावेळी मतदार हे कोणाच्या पारड्यात मत टाकणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र, संपूर्ण देशातील जे प्रतिष्ठेचे काही मतदारसंघ समजले जातात त्यापैकी बारामती हा देखील एक मतदारसंघ आहे. त्यामुळेच इथून नेमकं कोण विजय मिळवणार याकडे सध्या संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलं आहे.

 

 

    follow whatsapp