Shiv Sena UBT Candidates : श्रीकांत शिंदेंविरोधात ठाकरेंचा उमेदवार ठरला! चार उमेदवारांची घोषणा

मुस्तफा शेख

03 Apr 2024 (अपडेटेड: 03 Apr 2024, 02:55 PM)

Uddhav Thackeray Shiv Sena UBT Candidates : महाविकास आघाडीत ठाकरेंच्या शिवसेनेला २२ जागा मिळाल्या आहेत. त्यातील एक जागा ठाकरे मित्रपक्षाला देण्यास तयार आहे.

शिवसेना उमेदवारांची घोषणा उद्धव ठाकरे यांनी आज केली.

उद्धव ठाकरे यांनी चार लोकसभा उमेदवारांची घोषणा केली.

follow google news

Shiv Sena UBT Lok Sabha Candidates : कल्याण, पालघर, जळगाव आणि हातकणंगले या लोकसभा मतदारसंघात कोण उमेदवार असणार याचा सस्पेन्स अखेर संपला. जळगावचे माजी खासदार उन्मेष पाटील यांच्या पक्षप्रवेशानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन चार उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. त्यामुळे श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात कोण असणार, हे स्पष्ट झाले आहे. (Uddhav Thackeray Announced four Shiv Sena UBT Candidates For Lok Sabha)

हे वाचलं का?

उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीकडे असलेल्या चार लोकसभा मतदारसंघासाठी चार उमेदवारांची घोषणा केली. या नव्या चार नावांसह शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आतापर्यंत 21 उमेदवार जाहीर केले आहेत. 

महत्त्वाचं म्हणजे उद्धव ठाकरे हे हातकणंगले लोकसभा मतदारसंघात राजू शेट्टी यांना पाठिंबा देणार असल्याची चर्चा होती. मात्र, ठाकरेंनी महाविकास आघाडीचा उमेदवार जाहीर केला आहे.

उमेदवार जाहीर करताना ठाकरे काय म्हणाले?

"शिवसेनेचे एक वैशिष्टये आहे की, अनेक साधी, सामान्य माणसं मोठी केली. मोठी झालेली काही माणसं गद्दार निघाली, पण त्यांना मोठी करणारी माणसं, ती ताकद शिवसेनेमध्ये राहिली. म्हणून आम्ही असं ठरवलं की, कल्याणमधून शिवसेनेची कट्टर कार्यकर्ती वैशाली दरेकर या उद्याच्या कल्याणच्या खासदार असतील."

हेही वाचा >> श्रीकांत शिंदेंविरोधात ठाकरेंची रणरागिणी मैदानात, कोण आहेत वैशाली दरेकर?

"हातकणंगलेमधून सत्यजित पाटील, पालघरमध्ये आदिवासी आमच्या महिला आहेत भारती कामडी आणि जळगावमधून करण पवार यांचे नाव मी जाहीर करत आहे", अशी घोषणा ठाकरे यांनी केली. 

एक जागा काँग्रेसला सोडणार?

उद्धव ठाकरे यांनी एक जागा काँग्रेसला सोडण्याची तयारी दर्शवली आहे. ते म्हणाले, "आता एक जागा राहिली आहे, मुंबई उत्तर लोकसभा... आमच्या मित्रपक्षाला आम्ही विचारतोय की, ते लढणार आहेत का? ते लढत असतील, तर त्यांना लढू द्या नाही, तर आमचा उमेदवार आम्ही जाहीर करू", असे ठाकरे म्हणाले.

उद्धव ठाकरेंनी कोणत्या चार उमेदवारांची घोषणा केली?

कल्याण - वैशाली दरेकर
हातकणंगले - सत्यजीत पाटील
जळगाव - करण पवार 
पालघर - भारती कामडी

हेही वाचा >> "या पापाचे वाटेकरी होता कामा नये", पाटलांनी भाजप का सोडली?

आधी 'या' 17 उमेदवारांची केलेली घोषणा

सांगली - चंद्रहार पाटील
रायगड - अनंत गीते
बुलढाणा - नरेंद्र खेडेकर
यवतमाळ-वाशिम - संजय देशमुख
मावळ - संजय वाघेरे-पाटील
हिंगोली - नागेश पाटील आष्टीकर
छ. संभाजीनगर (औरंगाबाद) - चंद्रकांत खैरे
धाराशिव (उस्मानाबाद) - ओमराजे निंबाळकर
शिर्डी - भाऊसाहेब वाघचौरे
नाशिक - राजाभाऊ वाजे
रत्नागिरी-सिंधुदुर्ग - विनायक राऊत
ठाणे -राजन विचारे
मुंबई उत्तर-पूर्व (ईशान्य मुंबई) - संजय दिना पाटील
मुंबई दक्षिण -अरविंद सावंत
मुंबई उत्तर-पश्चिम (वायव्य) - अमोल कीर्तिकर
मुंबई दक्षिण मध्य - अनिल देसाई
परभणी - संजय जाधव

 

    follow whatsapp