कॅबिनेट मंत्र्यालाच माहिती नाही आपलं मतदान कुठे? सर्वसामान्यांनी काय करायचं, रोहित पवारांचा सवाल

Rohit Pawar on Ganesh Naik : राज्याचे वननंत्री गणेश नाईक यांचे नाव मतदार यादीतून गायब झाल्याने खबबळ उडाली होती. यावरुन रोहित पवार यांनी निवडणूक आयोग आणि भाजपवर निशाणा साधला आहे. गणेश नाईक हे सत्तेत असूनही ते भाजपच्या रणनीतीची शिकार झाले असल्याचे ते म्हणाले.

Mumbai Tak

मुंबई तक

15 Jan 2026 (अपडेटेड: 15 Jan 2026, 12:38 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

गणेश नाईक यांचे नाव मतदार यादीतून गायब झाल्याने खळबळ

point

रोहित पवार म्हणाले, गणेश नाईक हे भाजपच्या रणनीतीचे शिकार

Rohit Pawar on Ganesh Naik : राज्यातील 29 महानगरपालिकांच्या मतदानाला सुरुवात झाली असून काही ठिकाणी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेकजणांना मतदान केंद्र शोधण्यात अडचणी येत आहे; तर काही ठिकाणी ईव्हीएमध्ये बिघाड झाल्याची प्रकरणं समोर आली आहेत. मंत्री गणेश नाईक यांना मतदान केंद्रात गोंधळ असल्याने मतदानासाठी फिरावे लागल्याचे पाहायला मिळाले. मी आमदार मंत्री असून मतदान करावे की नाही? हा प्रश्न पडल्याचा संताप मंत्री गणेश नाईक यांनी व्यक्त केला. मतदानासाठी नेमके केंद्र कोणते हा गोंधळ सुरू असल्याने गणेश नाईक यांच्या परिवारासह फिरावे लागले होते. यावरुन रोहित पवार यांनी ट्विट करत निवडणूक आयोग आणि भाजपवर  निशाणा साधला आहे. तर दुसरीकडे केदार दिघे यांनीही ईव्हीएममधील बिघाडावरुन लोकशाहीच्या पारदर्शकतेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. दरम्यान एक तासाच्या शोधानंतर गणेश नाईक आणि त्यांच्या कुटुंबियांची नावे कोपखैरणे येथील मतदान केंद्रांवर सापडली आहेत.

हे वाचलं का?

हे ही वाचा : BMC Elections 2026 LIVE Update : मुंबई महानगरपालिका निवडणुकीचे लाइव्ह अपडेट्स... किती टक्के मतदान?

राज्याचे वनमंत्री गणेश नाईक भाजपच्या रणनीतीचे शिकार

राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांचे नाव मतदार यादीतून गायब झाल्याने खळबळ उडाली आहे. तर त्यांच्या कुटुंबातील तिघांची नावं वेगवेगळ्या मतदान केंद्रावर असल्याचे समोर आले आहे. यावरुन रोहित पवार यांनी ट्विट करत टीकास्त्र डागले आहे. आपल्या ट्विटमध्ये ते म्हणतात की, 'वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी मतदान करणारे राज्याचे वनमंत्री गणेश नाईक साहेब यांचं नाव मतदार यादीतून गायब आहे तर त्यांच्या कुटुंबातील तिघांची नावे तीन वेगवेगळ्या केंद्रावर आहेत. राज्याच्या एका कॅबिनेट मंत्र्यांनाच त्यांचं मतदान कुठं आहे हे माहित नसेल तर सामान्य लोकांना हे कसं कळणार? केवळ सत्तेतील एका पक्षाच्या सोयीसाठी वॉर्ड/प्रभाग रचनेपासूनच याची सुरवात झाली असून मतदारांचे चेहरे आणि आडनाव बघून त्यांना सोयीच्या प्रभागात टाकण्यात आलं. गणेश नाईक साहेब हे सत्तेत असूनही भाजपच्या रणनीतीची शिकार झाले आहेत. संपूर्ण राज्यात हीच अवस्था असून याबाबत निवडणूक आयोगाला जबाबदारी झटकता येणार नाही, उत्तर द्यावं लागेल..!

ईव्हीएममधील बिघाड हा लोकशाहीतील बिघाड

मतदानादरम्यान अनेक ठिकाणी ईव्हीएममध्ये बिघाड झाल्याची प्रकरणं समोर आली आहेत. यावरुन केदार दिघे यांनी लोकशाही बिघडली असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले की, 'म.न.पा निवडणुका सुरू आहेत आणि या निवडणुका दरम्यान मुंबई,ठाणे व अन्य म.न.पा मध्ये ईव्हीएम बिघाड झाल्याचे समोर येत आहे. हा ईव्हीएम बिघाड नसून हा लोकशाहीतील बिघाड आहे. बिघाड होणाऱ्या ईव्हीएम मधून पारदर्शक लोकशाहीची अपेक्षा काय करायची?'

हे ही वाचा : 29 Municipal Corporations Election LIVE Updates: 29 महापालिकांसाठी आज मतदान; मतदान टक्केवारी आणि लाईव्ह अपडेट्स एका क्लिकवर

अखेर नाईक यांचे नाव सापडले

राज्याचे वनमंत्री गणेश नाईक आणि त्यांच्या कुटुंबियांची नावं मतदारयादीत सापडत नव्हती. सकाळी 7:30 वाजल्यापासून हा घोळ सुरु होता. मात्र तासाभराच्या शोधानंतर कोपरखैरणे येथील सेंट मेरी हायस्कूल येथील मतदान केंद्रावर नाईक आणि त्यांच्या कुटंबियांची नावं सापडली. 

    follow whatsapp