Lok Sabha 2024 : भाजपला धक्का! खासदाराने काँग्रेसमध्ये केला प्रवेश

भागवत हिरेकर

10 Mar 2024 (अपडेटेड: 10 Mar 2024, 01:58 PM)

MP Brijendra Singh joined congress : लोकसभा निवडणूक तोंडावर असताना ब्रिजेंद्र सिंह यांनी भाजपचा राजीनामा दिला आहे.

खासदार ब्रिजेंद्र सिंह यांनी दिला भाजपचा राजीनामा. काँग्रेसमध्ये केला प्रवेश.

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर ब्रिजेंद्र सिंह यांनी भाजपचा राजीनामा दिला.

follow google news

MP Brijendra Singh News : हरयाणातील हिस्सार लोकसभा मतदारसंघातील भाजप खासदार ब्रिजेंद्र सिंह यांनी पक्षाचा तडकाफडकी राजीनामा दिला. भाजप सोडून त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या उपस्थितीत ब्रिजेंद्र सिंह यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. (Brijendra Singh, BJP MP from Hisar Lok Sabha seat of Haryana, Brijendra Singh has resigned from the party)

हे वाचलं का?

ब्रिजेंद्र सिंह यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट करून भाजपचा राजीनामा दिल्याची माहिती दिली. राजकीय कारणामुळे मी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याचे ब्रिजेंद्र सिंह यांनी सांगितले. मला हिस्सारचे खासदार म्हणून काम करण्याची संधी दिल्याबद्दल मी पक्ष (भाजप) तसेच पंतप्रधान मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आणि अमित शहा यांचे आभार मानू इच्छितो, असे त्यांनी सांगितले.

हेही वाचा >> "शिल्लक शिवसेनेचे अध्यक्ष", थेट ठाकरेंवरच वार; मविआमध्ये उफाळला वाद

भाजपचा राजीनामा दिल्यानंतर ब्रिजेंद्र सिंह यांनी त्यांचे वडील आणि माजी केंद्रीय मंत्री बिरेंद्र सिंह यांची दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी भेट घेतली. त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 

हरयाणात लोकसभेच्या 10 जागा आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीबद्दल बोलायचे झाले, तर भाजपने सर्व 10 जागा जिंकल्या होत्या. हिस्सारमधून भाजपचे उमेदवार ब्रिजेंद्र सिंह यांनी 314068 मतांनी विजय मिळवला होता. 

2019 च्या लोकसभा निवडणुकीत नोकरी सोडून राजकारणी बनलेले ब्रिजेंद्र सिंह यांनी हिस्सार लोकसभा मतदारसंघात जेजेपीचे दुष्यंत चौटाला आणि त्यावेळी काँग्रेससोबत असलेले भव्य बिश्नोई यांचा पराभव करून विजय मिळवला होता.

हेही वाचा >> सुप्रिया सुळेंची मागणी, अजित पवारांचं लगेच उत्तर; फडणवीसांसमोर काय घडलं?

ते केंद्रीय मंत्री बिरेंद्र सिंह यांचे सुपूत्र असून, आयएएसची नोकरी सोडून निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. भाजपचे माजी खासदार ब्रिजेंद्र सिंह यांचे वडील बिरेंद्र सिंह 2022 पर्यंत राज्यसभा सदस्य होते. 1977, 1982, 1994, 1996 आणि 2005 असे पाच वेळा ते उचाना येथून आमदार म्हणून निवडून आले आणि तीन वेळा राज्य सरकारमध्ये मंत्री राहिले. 1984 मध्ये ओमप्रकाश चौटाला यांचा पराभव करून बिरेंद्र सिंह हिस्सार लोकसभा मतदारसंघातून खासदार झाले होते.

    follow whatsapp