मुंबई : राजकारण आणि कला क्षेत्राचा सुंदर संगम घडवणारा एक सोहळा नुकताच पार पडला. शिवसेना पक्षाचे युवा नेते समाधान सरवणकर आणि लोकप्रिय अभिनेत्री तसेच निर्माती तेजस्विनी लोणारी यांचा साखरपुडा कुटुंबीय आणि जवळच्या नातेवाईकांच्या उपस्थितीत पार पडला. हा साखरपुडा पारंपरिक पद्धतीने पार पडला. दोघांच्या कुटुंबीयांनी, नातेवाईकांनी आणि मित्रपरिवाराने या सोहळ्याला उपस्थित राहून नव्या जोडीवर शुभेच्छांचा वर्षाव केला.
ADVERTISEMENT
हेही वाचा : मोठी बातमी: महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाला वेगळंच वळण; आरोपी पीएसआय गोपाळ बदने पोलिसांना शरण...
तेजस्विनी लोणारी ही मराठी चित्रपटसृष्टीतील एक लोकप्रिय अभिनेत्री असून तिने छापा काटा, वान्टेड बायको नंबर वन, गुलदस्ता, अफलातून, कलावंती यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे. तिने अनेक मराठी मालिकांमध्ये देखील तिच्या अभिनयाची छाप सोडली आहे. दुसरीकडे, समाधान सरवणकर हे शिवसेनेचे सक्रिय युवा नेते असून ते मुंबईतील राजकारणात सक्रिय भूमिका बजावत आहेत. सोशल मीडियावर या साखरपुड्याचे फोटो आणि व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहेत. दोघांना चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत असून “परफेक्ट कपल” म्हणून त्यांचे कौतुक केले जात आहे. लवकरच विवाहसोहळा पार पडणार असल्याची चर्चा सुरू असून चाहत्यांमध्ये या जोडप्याच्या लग्नाची उत्सुकता वाढली आहे.
तेजस्विनी लोणारी आता एका प्रतिष्ठित राजकीय परिवाराची सून होणार आहे. तिने शिवसेनेचे युवा नेते समाधान सरवणकर यांच्याशी साखरपुडा केला आहे. समाधान सरवणकर हे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सदानंद (सदा) सरवणकर यांचे पुत्र आहेत. सदा सरवणकर यांनी विधानसभा निवडणुकीत माहिम मतदारसंघातून शिवसेना उमेदवार म्हणून दोन वेळेस विजय मिळवला होता. सध्या ते शिंदे गटाशी संलग्न असून सक्रिय राजकीय भूमिका निभावत आहेत. त्यांचा मुलगा समाधान सरवणकर हा देखील पक्षाच्या युवा पिढीत प्रभावीपणे काम करत आहेत.
साखरपुड्याच्या समारंभातील एका व्हिडिओत तेजस्विनी लाल रंगाच्या पारंपरिक साडीत अतिशय देखणी दिसत आहे. तिच्या चेहऱ्यावर नववधूचा तेजस्वी आनंद झळकत आहे. अंगठ्या एकमेकांच्या हातात घालतानाचा खास व्हिडीओ विशेष लक्षवेधी ठरले असून, दोघांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद त्यांच्या नात्याचा गोडवा अधिक खुलवतोय. कुटुंबातील सदस्य आणि जवळचे नातेवाईक या सोहळ्याचे साक्षीदार ठरले.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT











