Child Pornography म्हणजे नेमकं काय? व्हिडीओ सापडला तर किती होईल शिक्षा?

रोहिणी ठोंबरे

• 07:45 AM • 25 Oct 2023

देशभरात सध्या लहान मुलांसोबतच्या अत्याचाराबाबत अनेक घटना समोर येत आहेत. कुठे बलात्कार, लैंगिक छळ तर, कुठे पोर्नोग्राफीसारखी प्रकरणं घडत आहेत. चाइल्ड पोर्नोग्राफीही त्यापैकीच एक.

What exactly is Child Pornography If the video is found how much will be the punishment

What exactly is Child Pornography If the video is found how much will be the punishment

follow google news

Child Pornography is Crime : देशभरात सध्या लहान मुलांसोबतच्या अत्याचाराबाबत अनेक घटना समोर येत आहेत. कुठे बलात्कार, लैंगिक छळ तर, कुठे पोर्नोग्राफीसारखी प्रकरणं घडत आहेत. भारतात पॉर्न पाहणे गुन्हा नाही. पण, चाइल्ड पोर्नोग्राफी पाहणे हा गुन्हा तर आहेच पण त्यासाठी सात वर्षांपर्यंतच्या शिक्षेची तरतूद आहे. चाइल्ड पोर्नोग्राफीबाबत देशात काय नियम आणि कायदे आहेत याबाबत आपण सविस्तर जाणून घेऊयात. (What exactly is Child Pornography If the video is found how much will be the punishment)

हे वाचलं का?

पोर्नोग्राफी म्हणजे काय?

पोर्नोग्राफीमध्ये लोकांचे नग्न फोटो किंवा अश्लील व्हिडीओ (Nude Video) दाखवले जातात. हे फोटो किंवा व्हिडीओ अनेकदा लैंगिक क्रिया दाखवत तयार केले जातात. अशा प्रकारचे हे व्हिडीओ इंटरनेटवर मोठ्या प्रमाणावर असतात.

वाचा: भावाच्या कृत्याने अलिबाग हादरलं! सख्ख्या बहिणींना ‘सूप’मधून दिला विषाचा ‘घोट’

पोर्नोग्राफीबद्दल वेगवेगळी मते आहेत. काही लोकांचा असा विश्वास आहे की ते स्वातंत्र्याखाली बनवले जावे आणि लोकांना जे पाहायचे आहे ते पाहू शकतात. दुसरीकडे, लोकांचा असा विश्वास आहे की त्याचा परिणाम नकारात्मक आहे आणि तो थांबला पाहिजे.

चाइल्ड पोर्नोग्राफी म्हणजे काय?

चाइल्ड पोर्नोग्राफी हा एक गुन्हा आहे ज्यामध्ये मुलांना आमिष दाखवून त्यांना ऑनलाइन संबंधांसाठी तयार करणे, त्यानंतर त्यांच्याशी शारीरिक संबंध ठेवणे किंवा मुलांशी संबंधित लैंगिक क्रिया रेकॉर्ड करणे, एमएमएस बनवणे, ते इतरांना पाठवणे इत्यादी गोष्टीही या अंतर्गत येतात. चाइल्ड पोर्नोग्राफीत 18 वर्षांखालील मुलांना टार्गेट केलं जातं.

भारतीय कायद्यानुसार, चाइल्ड पोर्नोग्राफी तयार करणे आणि शेअर करणे बेकायदेशीर आहे. याशिवाय चाइल्ड पॉर्न कंटेंट ठेवणे आणि पाहणे हाही गुन्हा आहे. POSCO कायदा 2012 च्या कलम 14 आणि 15 मध्ये असे नमूद केले आहे की चाइल्ड पोर्नोग्राफीसाठी कोणत्याही मुलाचा वापर केल्यास 5 वर्षांपर्यंत कारावास आणि 10 लाख रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. यासह, आयटी कायद्याच्या कलम 67B अंतर्गत, कोणत्याही प्रकारची लहान मुलांसंबंधित न्यूड कंटेंट बाळगणे, ब्राउझ करणे, डाउनलोड करणे, जाहिरात करणे किंवा शेअर करणे बेकायदेशीर आहे.

वाचा: Manoj Jarange : ‘…तोपर्यंत आम्ही फाशी घ्यायची का?’, गिरीश महाजनांना जरांगेंचा संतप्त सवाल

चाइल्ड पोर्नोग्राफीवरील कायदा

जगभरात चाइल्ड पोर्नोग्राफीवर कायदेशीर कारवाई केली जाते. या गुन्ह्यानंतर, सरकार चाइल्ड पोर्नोग्राफीसाठी कठोर शिक्षेची तरतूद करते. याशिवाय गुन्ह्यांची ओळख पटवण्यासाठी आणि रोखण्यासाठी अनेक संस्था आणि समुदायांकडून पुढाकार घेतला जातो.

वाचा: Crime : चार मुलांसमोरच बायकोचा दाबला गळा, मरेपर्यंत सोडलंच नाही; कारण…

पोर्नोग्राफीवर भारतीय कायदा काय म्हणतो?

भारतात, माहिती तंत्रज्ञान (IT) कायदा 2000, भारतीय दंड संहिता (IPC) आणि लैंगिक अपराधांपासून मुलांचे संरक्षण (POCSO) कायदा 2012 मध्ये पोर्नोग्राफीशी संबंधित अनेक तरतुदी आहेत. चाइल्ड पोर्नोग्राफी हा भारतात गुन्हा मानला जातो आणि त्यावर पुढीलप्रमाणे अनेक कायदे आहेत.

    follow whatsapp