बारामती: लग्नाच्या वरातीत पोलिसाला मारहाण, पथकावरही दगडफेक; नेमकं काय घडलं?

मुंबई तक

• 01:58 PM • 20 Nov 2021

वसंत मोरे, बारामती लग्नाच्या वरातीत कर्कश आवाजात वाजणाऱ्या डीजेवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर दगडफेक करून पोलीस कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याचा अत्यंत धक्कादायक प्रकार शुक्रवारी रात्री घडला आहे. बारामती शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत लिमटेक गावामध्ये हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी पोलिसांनी डीजे मालक चालकासह 23 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, कायद्याचे रक्षकच बारामतीत सुरक्षित […]

Mumbaitak
follow google news

वसंत मोरे, बारामती

हे वाचलं का?

लग्नाच्या वरातीत कर्कश आवाजात वाजणाऱ्या डीजेवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर दगडफेक करून पोलीस कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याचा अत्यंत धक्कादायक प्रकार शुक्रवारी रात्री घडला आहे. बारामती शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत लिमटेक गावामध्ये हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी पोलिसांनी डीजे मालक चालकासह 23 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, कायद्याचे रक्षकच बारामतीत सुरक्षित नसल्याची चर्चा सध्या बारामतीमध्ये रंगली आहे.

नेमकं काय घडलं?

शुक्रवारी रात्री बारामती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी विलास मोरे हे ड्यूटीवर असताना वरिष्ठांनी त्यांना लिमटेक येथे डिजे लावून वरात सुरु असल्याने तात्काळ लिमटेकला जाऊन कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानंतर मोरे यांच्यासह इतर तीन सहकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन वरात थांबवण्याची सूचना दिल्या.

जिल्ह्यात सध्या कलम 144 लागू आहे. याशिवाय डॉल्बी वाजविण्यासही बंदी असल्याची कल्पनाही दिली. पोलिसांनी सूचना देऊनही डॉल्बी बंद केला जात नसल्याने, ते गाडीतून उतरताच 10 ते 12 जणांच्या जमावाने मोरे यांना शिवीगाळ करून धक्काबुक्की सुरु केली. त्यावेळी अजय सोनवणे, अक्षय शिंदे, रोहित शिंदे, महेश खिलारे यांनी पोलिसांना शिवीगाळ सुरू करत, ‘आमचा डीजे बंद करतो काय? याला आपण खोट्या गुन्ह्यात अडकवू अशी दमदाटी करून मारहाण करण्यास सुरुवात केली.’

वरात सुरू असल्याने या घटनेमुळे जमाव मोठ्या प्रमाणावर एकत्र आला. काही जणांनी थेट पोलिसांच्या गाडीच्या दिशेने दगडफेक करण्यास सुरुवात केली. त्यामुळे मोरे यांच्याबरोबर गेलेले काळे व शेंडगे यांनी तिथून गाडी तात्काळ बाजूला घेतली. जमावातील सात ते आठ महिला मोरे यांच्या अंगावरही धावून गेल्या. त्यांनीही शिविगाळ करत त्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत मारहाण केली.

‘तसेच तुम्ही दारु पिऊन आमच्या महिलांच्या गळ्यातील सोने काढून घेतल्याचा गुन्हा तुमच्यावर दाखल करू.’ अशीही धमकी दिली असल्याचं विलास मोरे यांनी म्हटलं आहे.

या घटनेचे गांभीर्य ओळखून, काही वेळातच पोलीस निरीक्षक सुनील महाडिक हे पोलीस पथकासह घटनास्थळी पोहचले आणि त्यांनी तात्काळ मोरे यांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल केलं. याबाबत अजय सोनवणे, अक्षय शिंदे, रोहित शिंदे, महेश खिलारे यांच्यासह श्रीनाथ ओम डिजिटल मालक व ऑपरेटर व अन्य लोकांचा गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये समावेश आहे.

पालघर : लग्नात नियमांचा भंग केल्याप्रकरणी नवरदेवाच्या वडिलांना अटक

या सगळ्यांविरोधात सरकारी कामकाजात अडथळा आणणे, सरकारी कर्मचाऱ्याला मारहाणीसह, बेकायदा गर्दी जमाव जमवणे, महाराष्ट्र पोलीस कायदा, मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आले आहेत. याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नसल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे.

    follow whatsapp