Vidhan Parishad : काँग्रेसचे उमेदवार जाहीर, भाई जगताप आणि चंद्रकांत हंडोरे यांना तिकीट

राज्यात एकीकडे राज्यसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरू आहे. अशात आता विधान परिषदेची निवडणूकही चर्चेत आहे. यासाठी भाजपने पाच उमेदवार जाहीर केले आहेत. तर काँग्रेसचीही यादी जाहीर झाली आहे. काँग्रेसने चंद्रकांत हंडोरे आणि भाई जगताप या दोघांना संधी दिली आहे. काँग्रेसने विधान परिषद निवडणुकीसाठी भाई जगताप आणि चंद्रकांत हंडोरे यांना उमेदवारी दिली आहे. काँग्रेसकडून मोहन जोशी, […]

Mumbai Tak

मुंबई तक

• 10:21 AM • 08 Jun 2022

follow google news

राज्यात एकीकडे राज्यसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरू आहे. अशात आता विधान परिषदेची निवडणूकही चर्चेत आहे. यासाठी भाजपने पाच उमेदवार जाहीर केले आहेत. तर काँग्रेसचीही यादी जाहीर झाली आहे. काँग्रेसने चंद्रकांत हंडोरे आणि भाई जगताप या दोघांना संधी दिली आहे.

हे वाचलं का?

काँग्रेसने विधान परिषद निवडणुकीसाठी भाई जगताप आणि चंद्रकांत हंडोरे यांना उमेदवारी दिली आहे. काँग्रेसकडून मोहन जोशी, सिद्धार्थ हत्ती अंबरे, हर्षवर्धन सकपाळ, संजय दत्त, सचिन सावंत आणि अतुल लोंढे यांच्या नावांची चर्चा होती. मात्र दिल्लीतून भाई जगताप आणि चंद्रकांत हंडोरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे.

मागच्या निवडणुकीच्या वेळी प्रसाद लाड यांना भाई जगताप यांनी टक्कर दिली होती. अशात यावेळी जेव्हा भाई जगताप यांना काँग्रेसने पुन्हा संधी दिली आहे. भाजपने विधान परिषदेसाठी प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, श्रीकांत भारतीय, उमा खापरे आणि राम शिंदे यांना उमेदवारी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून एकनाथ खडसे आणि रामराजेंना उमेदवारी दिली जाईल अशी चर्चा आहे.

काय घडलं होतं सहा वर्षांपूर्वी

विधान परिषद निवडणुकीत भाजपने राष्ट्रवादीचे बंडखोर अपक्ष उमेदवार प्रसाद लाड यांच्या बाजूने मतदान केलं होतं. भाजपची मतं मिळवण्यासाठी तेव्हा प्रसाद लाड यांनी दिल्लीतल्या भाजप नेत्यांशी संपर्क साधला होता. यासोबत शिवसेनेने पाच नगरसेवकांची मतं लाड यांच्याकडे वळवली होती. प्रसाद लाड यांना त्या निवडणुकीत ५६ मतं मिळाली होती. तर त्यांना टक्कर देणाऱ्या भाई जगताप यांना ५८ मतं मिळाली होती. दोन जास्त मिळवून भाई जगताप जिंकले. मात्र त्यावेळी त्यांना भाजपने घाम फोडला होता. आता पुन्हा एकदा हे दोन नेते आमनेसामने असणार आहेत.

एवढंच नाही तर २०२१ मध्ये भाई जगताप आणि प्रसाद लाड यांच्या ट्विटर वॉरही रंगलं होतं. महागाई विरोधात मोर्चा काढणाऱ्या काँग्रेसचा मोर्चा होता. त्यावेळी बैलगाडीवरून भाई जगताप आणि इतर नेते खाली पडले होते. यानंतर गाढवांचा भार उचलण्यास बैलांचा नकार असं खोचक ट्विट भाजप नेते प्रसाद लाड यांनी केलं होतं. तर माझ्या पडण्याच्या व्हिडिओसाठी इतके उत्सुक असलेले सर्व भाजप नेते, जर ते देशाची अर्थव्यवस्था, शिक्षण, आरोग्य सेवेसाठी तितकेच उत्सुक अस्ते तर! आज देशाची स्थिती अशी झाली नसती…. असा टोला भाई जगताप यांनी लगावला होता.

    follow whatsapp