पक्षाने साथ दिली नसल्याची खंत, भाजपला क्लिन स्विपची संधी होती पण… – लक्ष्मीकांत पार्सेकर

गोव्याची विधानसभा निवडणुक यंदा गाजली ती भाजमधील प्रस्थापित नेत्यांनी पक्षाने संधी न दिल्यामुळे. उत्पल पर्रिकर, लक्ष्मीकांत पार्सेकर यांना यंदा संधी न दिल्यामुळे दोन्ही नेत्यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी जाहीर केली होती. मतमोजणीच्या वेळी प्रसारमाध्यमांशी बोलत असताना पार्सेकर यांनी पक्षाने साथ न दिल्याची खंत बोलून दाखवली. मांद्रे मतदारसंघात लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी पोस्टल मतांच्या मोजणीमध्ये आघाडी घेतली आहे. […]

Mumbai Tak

मुंबई तक

• 03:35 AM • 10 Mar 2022

follow google news

गोव्याची विधानसभा निवडणुक यंदा गाजली ती भाजमधील प्रस्थापित नेत्यांनी पक्षाने संधी न दिल्यामुळे. उत्पल पर्रिकर, लक्ष्मीकांत पार्सेकर यांना यंदा संधी न दिल्यामुळे दोन्ही नेत्यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी जाहीर केली होती. मतमोजणीच्या वेळी प्रसारमाध्यमांशी बोलत असताना पार्सेकर यांनी पक्षाने साथ न दिल्याची खंत बोलून दाखवली.

हे वाचलं का?

मांद्रे मतदारसंघात लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी पोस्टल मतांच्या मोजणीमध्ये आघाडी घेतली आहे. यंदाची निवडणूक मीच जिंकणार असा विश्वासही पार्सेकरांनी बोलून दाखवला. परंतू ज्या पक्षाला राज्यात मोठं करण्यासाठी मेहनत घेतली त्यांनी यंदा साथ न दिल्याची खंत असल्याचं पार्सेकरांनी बोलून दाखवली. एरवी निवडणुकीत मला पक्षाच्या कार्यकर्त्यांचा, नेत्यांचा पाठींबा असायचा परंतू यंदाची निवडणुकी ही माझ्या एकट्याच्या जोरावर लढवत असल्याचं पार्सेकरांनी सांगितलं.

Goa Election Counting: विश्वजीत राणे आमचेच, गरज पडली तर आमदार फोडून आणतील – भाजपचा दावा

गोव्यात यंदा भाजपला निवडणुकीत क्लिन स्विप मिळवण्याची चांगली संधी होती. भाजपविरोधी मत यंदा तीन ते चार पक्षांमध्ये विभागली गेली होती. परंतू भाजपने या संधीचा फायदा घेतला नाही असंही पार्सेकर म्हणाले. निवडणूक जिंकलो तर भाजपला पाठींबा देणार का असा प्रश्न विचारला असता पार्सेकरांनी सावध भूमिका देत त्याबद्दल आता काहीही बोलणं योग्य ठरणार नाही असं सांगितलं. राज्याच्या हिताच्या दृष्टीने जे काही गरजेचं असेल ती भूमिका घेईन असंही पार्सेकरांनी सांगितलं.

Goa Election Result 2022 LIVE Updates: गोव्यात काँग्रेसने पहिल्या कलांमध्ये गाठला बहुमताचा आकडा, भाजपला धक्का

    follow whatsapp